आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Trailer of Marathi film ‘Vishu’ launched. Will hit theaters on April 8. ये मालवण कहा आया? यहा दिल में… असे उत्तर देणारा विश्वनाथ मालवणकर ऊर्फ ‘विशू’ आता लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. श्री कृपा प्रॉडक्शन प्रस्तुत बाबू कृष्णा भोईर निर्मित या चित्रपटाचे लेखन आणि दिग्दर्शन मयूर मधुकर शिंदे यांनी केले आहे.

‘विशू’बद्दल दिग्दर्शक मयूर मधुकर शिंदे म्हणतात, ” शहरात राहूनही आपल्या गावाशी नाळ जोडणाऱ्या तरुणाची ही कहाणी आहे. दोन विरुद्ध स्वभावाच्या व्यक्ती जेव्हा एकत्र येतात. तेव्हा त्यांचा प्रवास कोणत्या किनाऱ्यावर येऊन थांबतो, हे यात पाहायला मिळणार आहे. हा एक कौटुंबिक चित्रपट असून तरुणाईलाही हा चित्रपट आवडेल. प्रत्येक कलाकाराने आपली भूमिका उत्तम साकारली आहे. गश्मीर आणि मृण्मयी ही जोडी या चित्रपटातून पहिल्यांदाच एकत्र झळकत आहे. कामानिमित्त मुंबईत आलेला तरुण वर्ग आपल्या गावची भाषा, संस्कृती, राहणीमान विसरत चालला आहे, या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा गावाविषयी ओढ निर्माण होईल.”

तर गश्मीर महाजनी आणि मृण्मयी गोडबोले म्हणतात, ” कॉर्पोरेट जगात वावरताना आपली मूळ संस्कृती मागे पडू लागली आहे. आपण पाश्च्यात्यांचे अनुकरण करू लागलो आहोत. स्पर्धेच्या युगात पळताना कुठेतरी माणूस म्हणून आपण हरवत चाललो आहोत आणि ही माणुसकी जपायची असेल तर आपली संस्कृती जपली जाणे तितकेच महत्वाचे आहे. हाच संदेश अतिशय हलक्या -फुलक्या पद्धतीने ‘विशू’च्या माध्यमातून देण्यात आला आहे.”

या चित्रपटात गश्मीर महाजनी, मृण्मयी गोडबोले यांच्यासोबत ऐताशा संझगिरी, मानसी मोहिले, मिलिंद पाठक, विजय निकम, संजय गुरुबक्शानी, प्रज्ञेश डिंगोरकर यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. ‘विशू’चे संवाद, पटकथा हृषिकेश कोळी यांची असून या चित्रपटाला हृषिकेश कामेरकर यांचे संगीत लाभले आहे. तर मंगेश कांगणे यांनी गाणी शब्दबद्ध केली आहेत. ‘विशू’चे छायाचित्रण मोहित जाधव यांनी केले आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment