कार्तिकबद्दल तुम्हाला हे माहीत आहे का? बर्थडे स्पेशल-कार्तिक आर्यन

‘प्यार का पंचनामा’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये दमदार एन्ट्री करणारे अभिनेता कार्तिक आर्यनचा जन्म २२ नोव्हेंबर १९८८ रोजी मध्य प्रदेश राज्यातील ग्वाल्हेर शहरात झाला. लहानपणापासूनच कार्तिकला अभिनेता व्हायचं होतं आणि जेव्हा तो हे स्वप्न घेऊन मुंबईत पोहोचला तेव्हा त्याला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. आज करोडपती असलेला कार्तिक, एकेकाळी एकाच फ्लॅट मध्ये १२ लोकांसमवेत रहात असे.

कार्तिक आर्यन च्या घरीही अगदी सुरुवातीपासूनच शिक्षणाचे वातावरण होते. कार्तिकचे वडील मनीष तिवारी आणि आई प्रगती तिवारी दोघेही व्यवसायाने डॉक्टर आहेत. बाह्यजगताशी त्यांचा फारसा संबंध नव्हता, पण असे असूनही केवळ स्वतःच्या अभिनयाच्या जोरावर आणि कोणाच्याही मदतीशिवाय कार्तिक आज एक यशस्वी कलाकार झाला आहे. अभिनेता होण्याचे स्वप्न घेऊन कार्तिक मुंबईत आला आणि त्याने अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला. रोज विविध ऑडिशनला जायचा. त्यावेळी कार्तिक भाड्याच्या फ्लॅटमध्ये १२ जणांसह राहत होता. तीन चित्रपट करूनही तो या लोकांसोबत राहत होता.

कार्तिकला त्याचा पहिला चित्रपट फेसबुकच्या माध्यमातून मिळाला. दिग्दर्शक लव्ह रंजनने फेसबुकवर कार्तिकचा फोटो पाहिल्याचे सांगितले जाते. त्यानंतर त्याने कार्तिकला त्याच्या चित्रपटासाठी ऑडिशन करण्यास सांगितले, त्यानंतर त्याला  ‘प्यार का पंचनामा’ चित्रपटासाठी साइन केले गेले. ‘प्यार का पंचनामा’  या चित्रपटात कार्तिक व्यतिरिक्त इतरही अनेक कलाकार होते, पण कार्तिकच्या पाच मिनिटांच्या एकपात्री सीनमुळे तो प्रेक्षकांच्या नजरेत आला. हा चित्रपट हिट झाल्यावर कार्तिकने सांगितले होते की ५.२९ मिनिटांचा त्याचा एकपात्री सीन पाठ करण्यासाठी त्याला पाच दिवस लागले होते आणि त्याने तो शूटिंगच्या वेळी केवळ दोन टेकमध्ये ओके केला होता.
Website | + posts

Leave a comment