आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

‘Baaplyok’ marathi movie trailer and song in trending

 बाप लेकाचं नातं दिसत नाही कारण ते अबोल असतं. चित्रपटांमधून फारसं  न दिसणारं बाप लेकाचं हे नातं आगामी ‘बापल्योक’ चित्रपटाच्यामाध्यमातून समोर येणार आहे. ‘नाईंटीनाईन प्रोडक्शन्स’चे विजय शिंदे आणि बहुरूपी प्रोडक्शन्स’च्या शशांक शेंडे आणि मकरंद माने यांनी याचित्रपटाची निर्मिती केली आहे. बाप लेकाच्या नात्याचा प्रवास दाखवणारा या चित्रपटाचा मनस्पर्शी ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अल्पावधीतच या ट्रेलरने वन मिलियन व्ह्यूज टप्पा गाठला आहे. ट्रेलर आणि चित्रपटातील ‘ उमगाया बाप रं’  हे गीतसध्या ट्रेंडिंगला आहे.  नागराज मंजुळे या  चित्रपटाचे प्रस्तुतकर्ते असून  रिंगण, कागर, सोयरीक या चित्रपटाचे दिग्दर्शन करणारे मकरंद माने या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. चित्रपटात वडिलांच्या भूमिकेत ज्येष्ठ अभिनेते शशांक शेंडे असून त्यांच्या मुलाची भूमिका विठ्ठल काळे यांनी साकारली आहे. या दोघांसोबत अभिनेत्री पायल जाधव, नीता शेंडे चित्रपटात दिसणार आहेत. ‘बापल्योक’ चित्रपट २५ ऑगस्टला चित्रपटगृहांत दाखल होतोय. 

 

‘बापल्योक’ चित्रपटाची कथा विट्ठल नागनाथ काळे यांची आहे. पटकथा आणि संवाद मकरंद माने व विट्ठल नागनाथ काळे यांचे आहेत. गुरु ठाकूर आणि वैभव देशमुख यांच्या लेखणीतून साकारलेल्या गीतांना विजय गवंडे यांनी संगीत आणि पार्श्वसंगीत दिले आहे. अजय गोगावले, आनंद शिंदे, अभय जोधपूरकर यांचा स्वरसाज गीतांना लाभला आहे. छायांकन योगेश कोळी यांचे असून संकलन आशय गाताडे यांचे आहे.

या चित्रपटाबद्दल बोलताना  नागराज मंजुळे म्हणाले की, ‘बाप लेकाच्यानात्याचा हा भावनिक  प्रवास  प्रत्येकालाच अंतर्मुख करेल. मकरंदने आजवरच्या त्याच्या चित्रपटांमधून नात्यांचे पैलू उलगडून दाखविले आहेत. या सर्व  चित्रपटांनी प्रेक्षकांच्या काळजाला हात घातला. त्याचा आजवरचा हा सर्वात उत्तम चित्रपट असून ‘बापल्योक’ चित्रपटातील वडिल मुलाच्या नात्याला हा प्रवास प्रत्येकाला समृद्ध करेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. एका चांगल्या कलाकृतीसाठी आम्ही एकत्र आलो असून ‘बापल्योक’ हा चित्रपट प्रत्येकाला उत्तम जीवनानुभव देईल, असा विश्वास निर्मात्यांनी व्यक्त केला.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment