आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Besharam Rang’, the first song from Pathaan, will be released on Monday, 12 December. निर्माता आदित्य चोप्रा आणि दिग्दर्शक सिद्धार्थ आनंद या दोघांनी प्रेक्षकांसमोर भारताचा पहिला भव्य साहसपट ‘पठाण’करिता सर्व मार्गाने प्रयत्नांची शर्थ केली आहे! पठाण हा यश राज फिल्म्सचा तगडा अॅक्शनपट म्हणजे नयनरम्य मेजवानी असून आदित्य चोप्राच्या महत्त्वाकांक्षी हेरगिरी विश्वाचा भाग असून त्यात आदित्य चोप्रा, दीपिका पदूकोण आणि जॉन अब्राहम झळकणार आहेत. हृदयाची धडधड वाढवणारी दृश्यं या सिनेमात असल्याने बंदुकीच्या टोकावर जीव घेण्याचा परवाना असलेल्या स्पायच्या भूमिकेत शाहरूख खान पाहता येईल.

सिद्धार्थने यापूर्वी सांगितल्याप्रमाणे, या साहसी मनोरंजनपर कलाकृतीचा प्लॉट पठाणच्या निर्मात्यांनी गुप्त ठेवला असून ट्रेलर प्रदर्शित करण्यापूर्वी त्यातील गाणी प्रसिद्ध करण्याची रणनिती आहे. सोमवार, दिनांक 12 डिसेंबर रोजी पठाणमधील पहिलं गाणं, बेशरम रंग प्रसिद्ध होणार आहे! दीपिका पदूकोण या गाण्यात तिच्या आजवरच्या सर्वाधिक ‘हॉट’ अंदाजात दिसणार असून ती व एसआरके यांच्यातील श्वास रोखून ठेवणाऱ्या केमेस्ट्रीचे दर्शन घडवतील.

सिद्धार्थ सांगतो, “हो, आमच्या फिल्मचं पहिलं गाणं सोमवारी प्रदर्शित होईल. बेशरम रंग असं त्याचं नाव असून त्यात आपल्या पिढीचे मोठे सुपरस्टार शाहरूख खान आणि दीपिका पदूकोण आजवरच्या दिलखेच अवतारात झळकतील.”

तो पुढे म्हणाला, “आमच्याकरिता हे गाणं म्हणजे सीझनचे एक पार्टी अँथम असून चाहत्यांनी अनेक वर्षांपासून बरीच प्रतीक्षा केली. आता चाहते आणि प्रेक्षकांनी आणखी काही काळ वाट पाहावी इतकंच त्यांना सांगेन. कारण सोमवारी सकाळी गाणं प्रसिद्ध होणार आहे! ते गाणं पाहताना प्रत्येक सेकंदाला प्रतीक्षेचं मोल समजेल!”

एसआरके आणि दीपिका ही भारतीय सिनेमाच्या इतिहासातील गाजलेली ऑनस्क्रीन जोडी असून त्यांनी ओम शांती ओम, चेन्नई एक्सप्रेस आणि हॅप्पी न्यू इयर सारख्या महान ब्लॉकबस्टरमध्ये एकत्र अभिनय साकारला आहे. बेशरम रंग’च्या स्पेनमधील चित्रीकरणादरम्यान दोघांच्या धमाल छायाचित्रांनी इंटरनेटवर चांगलाच गहजब केला! या ग्लॅमरस जोडीने मल्लॉरकाच्या डोंगरात चित्रीकरण पूर्ण केले. यावेळी एसआरके आपली एट-पॅक मिरवताना दिसला तर दीपिका बिकिनीत शोभली. त्यानंतर दोघं स्पेनमधील कॅडीझ आणि जेरेझला गेले, तिथे 27 मार्च रोजी चित्रीकरण पूर्ण केलं.

पठाण 25 जानेवारी 2023 रोजी हिंदी, तामीळ आणि तेलुगू भाषांत प्रदर्शनासाठी सज्ज आहे

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment