टीव्ही अभिनेता आशिष रॉय चे निधन

लॉकडाऊन दरम्यान प्रकृतीच्या कारणाने अस्वस्थ असलेला अभिनेता आशिष रॉय (वय ५५) चे आज पहाटे निधन झाले आहे. किडनीच्या आजाराने ग्रस्त असलेल्या आशिषने आपल्या राहत्या घरी अखेरचा श्वास घेतला, अशी माहिती सिंटा चे वरिष्ठ सहसचिव अमित बहल यांनी दिली. आशिषने बनेगी अपनी बात, ससुराल सिमर का, रीमिक्स, कुछ रंग प्यार के ऐसे भी व इतर बऱ्याच सारख्या लोकप्रिय टेलिव्हिजन सिरियल्स मधून काम केले आहे.

 


आशिषला दोन वेळा जुहू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तो डायलिसिस घेत होता पण दुर्दैवाने हातात पुरेसा पैसा शिल्लक नव्हता. तो काही काम मिळवण्याचा प्रयत्न करीत होता पण लॉकडाऊनमुळे काम मिळत नव्हते व पैशांच्या अभावामुळे त्याची परिस्थिती अतिशय बिकट झाली होती. मे महिन्यात आशिषला आयसीयूमध्ये दाखल केले होते. त्याने त्यांच्या फेसबुक अकाऊंटवर वर ही परिस्थिती कथन करीत मित्र व हितचिंतकांना आर्थिक मदतीचे आवाहन केले होते.
Website | + posts

Leave a comment