भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतनिमित्त महासोहळा साजरा कारण्यासाठी सोनी मराठी वाहिनीवर ‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. आनंद शिंदे, आदर्श शिंदे असे दिग्गज कलाकार क्रांतिसूर्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची स्तुतिकवने गाणार आहेत.
बाबासाहेबांवरील या कार्यक्रमात प्रेक्षकांना पोवाडा, कव्वाली आणि पाळणा हे पाहायला मिळणार आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या भूमिकेद्वारे महाराष्ट्राच्या घराघरांत पोचलेला अभिनेता सागर देशमुख या कार्यक्रमाद्वारे पुन्हा एकदा बाबासाहेबांच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे.
‘जयजयकार क्रांतिसूर्याचा’ हा कार्यक्रम ११ एप्रिल दुपारी १ आणि संध्या. ७ वा. फक्त आपल्या सोनी मराठी वाहिनीवर.