बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री तापसी पन्नूची च्या हातात सध्या काही अतिशय उत्कंठावर्धक सिनेमांचे प्रोजेक्ट आहेत. आज तापसीने तिच्या आगामी ‘रश्मी रॉकेट’ सिनेमाचा फोटो तिच्या ट्विटर हॅन्डल वरून शेअर केलाय. ‘रश्मी रॉकेट’ च्या शुटिंगचे पहिले शेड्युल संपले असल्याचे तिने यात सांगितले असून आता ‘लूप लपेटा’ या सिनेमाचे शूटिंगचा प्रारंभ होत असल्याचेही तिने यात नमूद केले आहे. रश्मी रॉकेट सिनेमाच्या फोटोत ती रनिंग ट्रॅक वर धावतांना दिसत आहे. एका लहानशा खेड्यातील मुलगी, कसा संघर्ष करून एक मोठी धावपटू बनते ही ‘रश्मी रॉकेट’ची कथा आहे.
‘लूप लपेटा’ हा टॉम टायकर्वरचा, १९९८ सालचा, हिट जर्मनी चित्रपट ‘रन लोला रन’ चे हिंदी रूपांतर आहे. यात ताहिर राज भसीन देखील मुख्य भूमिकेत आहे. विशेष म्हणजे कोविड -१९ चा विमा उतरवला गेलेला हा पहिला हिंदी चित्रपट आहे.
तापसी सोशल मीडियावर नेहमीच अ‍ॅक्टिव असते व तिचे फॅन्स सुद्धा मोठ्या संख्येने तिला फॉलो करतात. तिच्या वैयक्तिक व व्यावसायिक कामाचे फोटोज, व्हिडीओज ती सातत्याने शेअर करत असते. तापसीच्या आगामी चित्रपटांमध्ये ‘शाबाश मिठू’, ‘रश्मी रॉकेट’, ‘हसीन दिलरूबा’ आणि ‘लूप लपेटा’ या नावांचा समावेश आहे.
Website | + posts

Leave a comment