‘प्लॅनेट मराठी ओटीटी’, अ विस्टा मीडिया कॅपिटल कंपनीने ओटीटी प्लॅटफॉर्मवर दमदार एंट्री केली. यापूर्वीच ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपल्या आगामी वेबसिरीज आणि चित्रपटांची घोषणा केली आहे. तत्पूर्वी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’ने आपले गौरव गीत प्रेक्षकांच्या भेटीला आणले आहे. ‘म… मानाचा, म… महानतेचा, म… मनोरंजनाचा’ असे या गाण्याचे बोल आहेत. मराठी सिनेसृष्टीतील तारेतारका या ‘प्लॅनेट मराठी’वर अवतारल्याने हे गाणे अधिकच बहारदार झाले आहे. (Planet Marathi OTT Platform Anthem Launched)

मराठी मनाला आपल्या संस्कृतीचा अभिमान वाटावा, असे समीर सामंत यांचे गीतलेखन असून या गाण्याला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. तर या गाण्याला स्वप्निल बांदोडकर, आदर्श शिंदे, योगिता गोडबोले, वैशाली माडे यांनी स्वरबद्ध केले आहे. पुष्कर श्रोत्री यांचे दिग्दर्शन लाभलेल्या या गाण्यात अक्षय बर्दापूरकर, ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले, सचिन पिळगावकर, शरद केळकर, अमृता खानविलकर, सोनाली कुलकर्णी, सिद्धार्थ जाधव, तेजस्विनी पंडित, पुष्कर श्रोत्री, सुबोध भावे, मृण्मयी देशपांडे, प्रिया बापट, मृणाल कुलकर्णी, प्राजक्ता माळी, संजय जाधव, अभिजीत पानसे, प्रसाद ओक, जितेंद्र जोशी, आदिनाथ कोठारे, उर्मिला कोठारे, सोनाली खरे, भार्गवी चिरमुले, पर्ण पेठे, स्मिता तांबे, गायत्री दातार, अभिजीत खांडकेकर, सिद्धार्थ मेनन, भाग्यश्री मिलिंद, नेहा शितोळे, दीप्ती देवी, संदीप पाठक, निखिल चव्हाण, तेजस बर्वे, सुरभी हांडे, सुव्रत जोशी आणि शिवानी बावकर यांचा सहभाग आहे.

पहा गौरव गीत इथे – 

या गौरव गीताविषयी ‘प्लॅनेट मराठी ओटीटी’चे प्रमुख, संस्थापक अक्षय बर्दापूरकर सांगतात, ”प्रेक्षकांना सर्वोत्कृष्ट कन्टेन्ट देण्यासाठी आमचा सर्वोतोपरी प्रयत्न असेल. लवकरच नवनवीन कन्टेंट घेऊन आम्ही तुमच्या भेटीला येऊ आणि आम्हाला आशा आहे हा मनोरंजनाचा खजिना तुम्हाला नक्कीच आवडेल. मला याचीही खात्री आहे, हे गौरव गीतही प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीस उतरेल. आपल्या मराठी भाषेला समृद्ध आणि वैभवशाली वारसा लाभला आहे. हा वारसा सातासमुद्रापार पोहोचवण्याचा आणि मराठी अस्मिता जपण्याचा प्रयत्न या गौरवगीतामधून करण्यात आला आहे. तसेच या गौरव गीतामध्ये सहभागी झालेल्या कलाकारांमुळे या गाण्याला चारचाँद लागले आहेत. मुळात मराठी सिनेसृष्टी हे आमचे एक कुटुंबच आहे आणि त्यांनी वेळोवेळी आम्हाला सहकार्य केले आहे. वेळात वेळ काढून या गाण्यात, परिवारात सहभागी झालेल्या सर्व तारेतारकांचे मनापासून आभार.”

हेही वाचा – ‘प्लॅनेट मराठी’ची वेबसिरीज ‘अनुराधा’ ऑनफ्लोर.. संजय जाधव करणार दिग्दर्शन

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.