‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम घराघरांत आवडीने पाहिला जातो. हा कार्यक्रम बघताना प्रत्येकाला असं वाटत की, मी जर हॉटसीटवर असतो/असते, तर एवढी रक्कम नक्कीच जिंकली असती. आता अशीच एक संधी सोनी मराठी वाहिनी  प्रेक्षकांसाठी घेऊन आली आहे. १२ जुलैपासून ‘कोण होणार करोडपती’ हा कार्यक्रम सोम.शनि., रात्री ९ वा. सोनी मराठी वाहिनीवर सुरू होणार आहे. हा कार्यक्रम पाहताना  प्रेक्षक आता घरबसल्या १ लाख रुपये जिंकू शकतात. (Kaun Banega Crorepati Marathi starting from 12th july on Sony Marathi Channel)

सोनी लिव्ह या ॲपवर सोम.-शनि., रात्री ९ वा. ‘कोण होणार करोडपती’ पाहता-पाहता टीव्हीवर विचारलेल्या प्रश्नांची अचूक उत्तरं प्ले अलॉंगवर देऊन प्रेक्षक जिंकू शकतात १ लाख रुपये आणि हे जिंकायला एकच गोष्ट तुम्हांला मदत करू शकते, ते म्हणजे तुमचं ज्ञान! कुठेही न जाता, घरात बसून प्रेक्षक  या खेळात निवांत सहभागी होऊन, लखपती होऊ शकतात.

हेही वाचा – मुक्ता आणि उमेश झळकणार सोनी मराठी वाहिनीवर – ‘अजूनही बरसात आहे’ 12 जुलैपासून

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.