आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

झी5 पुरस्कार विजेती निर्माता जोडी अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांची ‘ब्रेक पॉइंट’ ही 7 भागांची मालिका घेऊन येत आहे. (First Look of Ashwini Iyer Tiwari’s Zee5 Web Series Break Point on Leander Paes and Mahesh Bhupathi released) दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेस आणि महेश भूपति यांचे ऑफ-कोर्ट जीवन आणि त्यांच्या प्रतिष्ठित अशा ऑन-कोर्ट भागीदारीवर आधारित ही मालिका असणार आहे. निर्मात्यांनी या झी5 ओरिजिनल सीरीजचे पहिले पोस्टर प्रदर्शित केले असून असे वाटतेय की ‘ली-हेश’ च्या नाते आणि ब्रेक-अप बाबत चाहत्यांना पडलेल्या प्रश्नांची उत्तरे त्यांना लवकरच मिळणार आहेत!

‘ब्रेक पॉइंट’च्या दिग्दर्शनाविषयी बोलताना, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी म्हणतात की, “झी5 सारख्या घराघरात पोहोचलेल्या व्हिडीओ स्ट्रीमिंग प्लेटफॉर्मवर अशा तऱ्हेच्या सीरीजला दाखवण्यात येणार आहे ही खूप चांगली गोष्ट आहे. महेश भूपति आणि लिएंडर सारख्या आयकॉन्ससोबत काम करणे अद्भुत होते आणि त्यांची अव्यक्त कहाणीला पडद्यावर उतरवणे अशी गोष्ट आहे, जी आम्ही नेहमीच जपून ठेवू इच्छितो.”

लिएंडर पेसने याविषयी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “मी झी5 च्या सहयोगातून अश्विनी अय्यर तिवारी, नितेश तिवारी यांच्यासारख्या अद्भुत कथाकारांसोबत ‘ब्रेक पॉइंट’साठी या वॉक डाउन मेमरी लेनच्या शूटिंगचा आनंद घेतला आहे. जेव्हा कि महेश आणि माझी ऑन-कोर्ट भागीदारी व्यापक रूपात कवर झाली आहे मात्र, आमच्या ऑफ-कोर्ट केमिस्ट्रीबाबत केवळ अनुमान लावण्यात आले आहेत. हे पहिल्यांदाच होत आहे जेव्हा आमच्या चाहत्यांना हे सगळे पहायला आणि ऐकायला मिळणार आहे, महेश आणि मी भारताला विश्व टेनिसच्या नकाशावर आणण्यासाठी कठोर मेहनत घेतली आहे आणि आम्हाला आनंद आहे की आम्हाला आमची कहाणी जगासमोर मांडण्याची संधी मिळत आहे. हे पहिल्यांदाच होत आहे. आमच्या या प्रवासाचा आनंद घ्या.”

महेश भूपतीने संगितले की, “यात जेव्हा संवाद साधण्याची गोष्ट असते तेव्हा मी रिझर्व्हड होऊन जातो, हे काही आता रहस्य राहिलेले नाही, त्यामुळे हा प्रवास पुन्हा जिवंत करणे आणि शक्य तितक्या स्पष्ट आणि प्रामाणिक मार्गाने सादर करणे, हे एक मोठे पाऊल आहे. पण, त्याच वेळी, मला आनंद आहे कि आमच्या चाहत्यांना आमचा हा प्रवास पहायला मिळणार आहे ज्यामध्ये कष्ट, चिकाटी, बंधुता आणि कधीकधी रक्त आणि अश्रू यांचे मिश्रण होते. हे निश्चीतच सर्वांसाठी एक ट्रिट असणार आहे आणि हे सर्व काही देण्यासाठी मी, अश्विनी नितेश आणि झी5चा आभारी आहे.”

अनेक दशकांपासून, भारतीयांनी देशाच्या या दिग्गज टेनिसपटूंचा गौरव केला आहे ज्यांनी अनेक प्रतिष्ठित सामने जिंकून भारताचा सन्मान वाढवला आहे. त्यांच्या सार्वजनिकपणे विभक्त होण्याचा अंदाज देखील लावला आहे. तथापि, पहिल्यांदाच, या सर्व अटकळांना विश्रांती दिली जाईल कारण पेस आणि भूपती त्यांच्या नात्याबद्दल आणि ब्रेकअपबद्दल स्पष्ट आणि प्रामाणिक पणे जगाला सांगतील- काय झाले, कसे झाले आणि का! ‘ब्रेक पॉईंट’ केवळ त्यांच्या महान टेनिस सामन्यांवरच नाही तर कोर्टवर आणि बाहेर त्यांच्या नातेसंबंधावर प्रकाश टाकेल.

ashwini iyer tiwari's break point

‘ब्रेक पॉइंट’ ही त्यांची मैत्री, बंधुता, भागीदारी, विश्वास, कठोर मेहनत आणि महत्वाकांक्षा यावर आधारित एक कथा आहे, ज्यामुळे ती 1990 च्या दशकाच्या उत्तरार्धातील सर्वात धोकादायक दुहेरी जोडी होती आणि वर्ष 1999 पर्यंत जगात पहिल्या क्रमांकावर होती. पण हे त्यांच्या कटू दुराव्यावर देखील प्रकाश टाकते. सर्वात महत्त्वाचे म्हणजे, ही दोन मित्रांची कथा आहे ज्यांनी यशाची योजना आखली परंतु यशानंतरच्या जीवनाची नाही.

‘ब्रेक पॉइंट’ चित्रपट निर्माते, अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी यांच्या त्यांच्या बॅनर अर्थस्काय पिक्चर्स आणि झी5च्या अंतर्गत पहिल्या भागीदारीला चिन्हांकित करतात, जे दंगल, पंगा, छिछोरे, नील बेटे सन्नाटा सारख्या विलक्षण चित्रपटांसाठी ओळखले जातात. अश्विनी अय्यर तिवारी आणि नितेश तिवारी हे पहिल्यांदाच एकत्रितपणे सह-दिग्दर्शन करणार आहेत. ही सात भागांची मालिका लवकरच झी5 वर उपलब्ध होईल.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment