– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Sirf Ek Bandaa Kafi Hai Movie Review

कथानक थोडक्यात – चित्रपटाचे कथानक सत्य घटनांवर आधारित आहे. आसाराम बापू यांना २०१३ सालच्या अल्पवयीन मुलीवर केलेल्या बलात्काराच्या केसमध्ये जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली ती २०१८ साली. ५ वर्षे चाललेल्या या कोर्टकेस मध्ये सरकारी वकील पी सी सोलंकी (मनोज बाजपाई) यांनी ही कायदेशीर लढाई कशा प्रकारे जिंकली, कोणकोणत्या संकटांना त्यांना सामोरे जावे लागले हे या कोर्टरूम ड्रामा मध्ये दाखविण्यात आले आहे. ऑगस्ट 2013 मध्ये, जोधपूरजवळील मनाई गावात आसाराम बापूच्या आश्रमात राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने 15 ऑगस्टच्या रात्री जोधपूरमधील मनाई आश्रमात आसारामवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप केला होता आणि त्यानंतर आसारामचे शिष्य असलेल्या मुलीच्या पालकांनी दिल्लीत पोलिसांत तक्रार दाखल केली. 31 ऑगस्टपर्यंत आसाराम चौकशीसाठी हजर झाला नाही, तेव्हा दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर आयपीसीच्या अनेक अजामीनपात्र कलमांखाली व सर्वात महत्वाच्या म्हणजे पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला होता आणि नंतर त्याच्यावर ५ वर्षे हा खटला चालला. अनेक साक्षीदारांना मारण्यात आले, धमकाविण्यात आले, अनेक राजकीय व हाय-प्रोफाइल लोकं या केसमध्ये इन्व्हॉल्व्ह कसे झाले आणि त्यांनी वकिल सोलंकी यांच्यावर कसा दबाव आणला हे सर्व चित्रपटात बघावयास मिळते.

काय विशेष?- दीपक किन्गरानी यांनी लिहिलेली कथा, पटकथा आणि संवाद ही बंदा ची विशेषता आहे असे मी म्हणेन. सत्य घटनांना समोर ठेऊन त्याला उगाच फिल्मी तडका ना मारता कथाकाराने घटनेचे गांभीर्य सुरुवातीपासून शेवटपर्यंत कायम कसे राहील याची काळजी घेतली आहे. अपूर्व कार्की यांचे दिग्दर्शन सुद्धा अत्यंत प्रभावी असे आहे. अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचारांविरुद्ध एकट्या वकिलाने दिलेला लढा अत्यंत रोमांचक पद्धतीने कथाकार आणि दिग्दर्शकाने सादर केला आहे. विशेष म्हणजे यात कुठेही अतिशयोक्ती न करता, जे घडलेय, जसे घडलेय त्याला एकनिष्ठ राहून अत्यंत संयमित पद्धतीने हे सत्य दिग्दर्शकाने मांडले आहे. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच कलाकारांच्या बाबतीत सुद्धा चित्रपटभर एक मनोज बाजपाई काफी है असे चित्र आहे आणि मनोज ने अत्यंत सफाईदार आणि मेहनतीने ही भूमिका साकारली आहे. एक सामान्य मध्यमवर्गीय कुटुंबातील वकिलाची परंतु तितकीच विलक्षण ताकदीची ही भूमिका केवळ मनोज सारखाच परिपक्व अभिनेता साकारू शकतो हे चित्रपटभर जाणवते. हॅट्स ऑफ टू यु मनोज भाई. जस्ट हॅट्स ऑफ अगेन अँड अगेन. अल्पवयीन पिडीत मुलीच्या भूमिकेत अभिनेत्री अद्रीजा हिचे कामही उत्तम झाले आहे.

नावीन्य काय?- आसाराम बापू यांच्यावर चाललेल्या बलात्काराच्या खाटल्यावर आधारित अशा प्रकारचा हा पहिलाच प्रयत्न आहे आणि हेच चित्रपटाचे एका अर्थाने नावीन्य आहे.

कुठे कमी पडतो? – चित्रपटाच्या मध्याच्या नंतर काही काळासाठी कथानकाची गती अचानक मंदावते. अर्जुन कुकरेती यांचे छायांकन आणि संदीप चौटा यांचे पार्श्वसंगीत या डिपार्टमेंट मध्ये सुद्धा चित्रपट चांगला आहे पण याहीपेक्षा आणखी उत्तम असू शकला असता. चित्रपट आजकालच्या ओटीटी कण्टेण्ट सारखा भडक किंवा दाहक नाहीए. त्यामुळे आरोपी च्या विरोधात अपेक्षित चीड आणि असंतोष निर्माण करण्यात आणि पीडितेवर झालेल्या अत्याचारामुळे तिच्यासाठी सहानभूती निर्माण करण्यात चित्रपट काहीसा कमी पडतो. थोडक्यात अजून जास्त हार्ड हीटिंग हवा होता.

पहावा का?- अवश्य. झी-५ या ओटीटी वर सिनेमा प्रदर्शित झालाय.

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment