– अजिंक्य उजळंबकर

————————

आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Satyaprem Ki Katha Movie Review

गेल्या वर्षीच्या भूल भुलैय्या २ च्या सुपरहिट यशानंतर यावर्षी आलेला शहजादा मात्र बॉक्स ऑफिसवर साफ कोसळला म्हणून कार्तिक आर्यनचे फॅन्स आज प्रदर्शित झालेल्या सत्यप्रेम की कथा ची आतुरतेने वाट बघत होते हे आज सिनेमाला मिळालेल्या दणदणीत ऍडव्हान्स बुकिंग ने स्पष्ट होते. डबल सीट, आनंदी गोपाळ सारख्या यशस्वी आणि समीक्षकांनी कौतुक केलेल्या मराठी सिनेमांचे दिग्दर्शक समीर विद्वंस सत्यप्रेम की कथा द्वारे हिंदीत पदार्पण करीत आहेत. तर सिद्धार्थ मल्होत्रा सोबत यावर्षी फेब्रुवारीमध्ये लग्न झाल्यानंतर आलेला किआरा अडवानी चा सत्यप्रेम की कथा हा पहिलाच चित्रपट. 

कथानक थोडक्यात – कथेचा नायक आहे एक मध्यमवर्गीय सामान्य कुटुंबात  अहमदाबाद येथे आपल्या आई-वडील आणि बहिणीसोबत राहणारा सत्यप्रेम उर्फ सत्तू (कार्तिक आर्यन). आपल्या बॅचलर लाईफला कंटाळलेला सत्तू लॉ ची फायनल एक्झाम फेल झालाय आणि नौकरी किंवा धंदा पाणी काहीच नसल्याने त्याचे लग्न ठरत नाहीये. आई जी गरब्याचे डान्स क्लासेस घेत असते ती (सुप्रिया पाठक) आणि वडील (गजराज राव) हे सत्तूला काहीतरी धंदा पाणी बघ म्हणून सतत मागे लागलेले असतात मात्र सत्तूला आधी लग्न करायचे आहे.  एका गरब्यात भेट झाल्यानंतर सत्तू जवळपास वर्षभरापासून एकतर्फी  प्रेमात पडलाय कथा (कियारा अडवानी ) च्या. उच्चभ्रू श्रीमंत घराण्यातील कथा चे वडील (सिद्धार्थ  रांडेरिया) शहरातील मोठे व्यावसायिक आहेत तर आई (अनुराधा पटेल) एक हाऊसवाईफ. सत्तूच्या प्रेमाच्या कबुलीनंतरही त्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या कथा चे प्रेम असते तपन वर. सत्तूशी मित्रासारखे नाते असणाऱ्या त्याच्या वडिलांना सत्तू च्या प्रेमाची माहिती असते आणि त्यांना जेंव्हा कळते की कथा आणि तपन यांचे आता बिनसले आहे, ते सत्तू ला आग्रह करतात की तू जाऊन परत एकदा कथा ला आपल्या प्रेमाची कबुली दे. ती देण्यासाठी कथा च्या घरी पोहोचलेल्या सत्तू ला मोठा धक्का बसतो. कथा ने नेमक्या त्याचवेळी आत्महत्या चा प्रयत्न केलेला असतो. सत्तू तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाते आणि कथा वाचते. मग एके दिवशी सकाळी अचानक कथा चे आई-वडील सत्तू च्या घरी पोहोचतात. कथा चा सत्तू साठी लग्नाचा रिश्ता घेऊन. असं काय घडतं की एवढे उच्चभ्रू घराण्यातील कथाचे आई-वडील एका अतिसामान्य घरातील सत्तू सोबत तिचे लग्न लावून द्यायला तयार होतात? सत्तू ला सुद्धा कथा च्या प्रेम प्रकरणाची माहिती असते मग तो कसा काय या लग्नाला होकार देतो? कथा जी या लग्नासाठी तयार नाहीये ती कशी काय तयार होते आणि पुढे सत्तू आणि कथा एकत्र कसे येतात हे सांगत कथानक पुढे सरकत जाते. 

काय विशेष?- चित्रपटाची दमदार कथा पटकथा जी लिहिली आहे करण शर्मा यांनी. संवाद सुद्धा त्यांचेच आहेत. पटकथेची विशेषता म्हणजे ही तुमची जेवढी करमणूक करते अखेरीस तितकाच प्रभावी असा सामाजिक संदेश सुद्धा देते. मध्यंतरापर्यंत काहीशी रटाळ वाटणारी कथा मध्यंतरानंतर मात्र एकानंतर एक धक्के देत रंजक होत जाते आणि प्रेक्षकांना हमखास गुंतवून ठेवते. याबद्दल करण शर्मा यांचे विशेष कौतुक. समीर विद्वंस यांचे दिग्दर्शन सुद्धा तितकेच प्रभावी आणि कथेला न्याय देणारे झाले आहे. कथेतील सत्तू आणि त्याच्या वडिलांचे मैत्रीपूर्ण नाते दाखविणारे प्रसंग छान जमले आहेत. कथानकात मध्यंतरानंतर आणि शेवटी एक मोठा ट्विस्ट अथवा धक्का आहे जो इथे सांगणे उचित ठरणार नाही. संगीतकार मनन भारद्वाज यांचे आज के बाद हे गाणे इन्स्टंट हिट आहे तर पायल देव यांचे नसीब से हे गाणे श्रवणीय आहे. पसुरी नु या ऑलरेडी सुपरहिट गाण्याचे अरिजित सिंग च्या आवजातालें व्हर्जन ऐकायला छान वाटते. थोडक्यात संगीताच्या बाबतीत चित्रपट प्लस आहे. छायांकन, पार्श्वसंगीत या डिपार्टमेंट सोबतच चित्रपटाची इतर तांत्रिक बाजू सुद्धा बरी आहे. अभिनयाच्या बाबतीत आऊटस्टँडिंग परफॉर्मन्स असे ज्याला म्हणता येईल तो आहे कियारा अडवाणी चा. कमालीचा प्रभावी आणि ह्रदयस्पर्शी अभिनय केलाय कियाराने. कथा ही भूमिका कियारा अक्षरशः जगली आहे. कियारासोबतच कार्तिकने सुद्धा सत्तू झक्कास साकारला आहे. कार्तिक च्या करिअरमधील हा वन ऑफ दि बेस्ट परफॉर्मेंस ठरावा आणि कियारा च्या सुद्धा. कार्तिक च्या आई-वडिलांच्या भूमिकेत सुप्रिया पाठक आणि गजराज राव सुद्धा मस्त. कियाराच्या आई-वडिलांच्या भूमिकेत मात्र अनुराधा पटेल आणि सिद्धार्थ  रांडेरिया यांच्याऐवजी आणखी वजनदार कलाकारांची आवश्यकता होती. 

नावीन्य काय?- कथानकात खूप काही नावीन्य नसले तरी कथेत असणारा ट्विस्ट आणि त्याला दिलेली करमणूक प्रधान आणि सोबतच अखेरीस एक सामाजिक संदेश ही पॅरलल ट्रीटमेंट हे नावीन्य म्हणावे लागेल. महिलावर्गास खासकरून जवळचे वाटेल असे कथेचे सादरीकरण आहे.  

कुठे कमी पडतो? – मध्यंतरापर्यंत काहीसा रटाळ वाटणारा भाग अजून आकर्षक होऊ शकला असता. दमदार पटकथा जरी असली तरी त्याला न्याय देणारे तितकेच दमदार संवाद लिहितांना करण शर्मा कमी पडले आहेत. संगीत बरे जरी असले तरी याहीपेक्षा उत्तम असू शकले असते. समीर विद्वंस यांचे दिग्दर्शन प्रभावी व एन्गेजिंग  नक्की आहे, कथानकातील इमोशनल सीन्स समीरने परिणामकारक रित्या मांडले आहेत पण  पण कथानकात असलेले नाट्यमय आणि विनोदी प्रसंग तितक्याच  प्रभावीपणे  दाखविण्यात समीर कमी पडलाय. 

पहावा का?- अवश्य बघावी अशी कलाकृती. तेही संपूर्ण परिवारासोबत. नाही थिएटरमध्ये जमलं तर ओटीटी वर तर नक्की. 

स्टार रेटींग – ३.५  स्टार. 

इतर हिंदी चित्रपट परीक्षणांसाठी क्लिक करा 

Ajinkya Ujlambkar
+ posts

Leave a comment