बॉलिवूड स्टार आयुष्मान खुराना पुन्हा एकदा प्रसिद्ध चित्रपट निर्माता अनुभव सिन्हा दिग्दर्शित ‘अनेक’ या चित्रपटाच्या घोषणेने चर्चेत आला आहे. फर्स्ट लूकच्या रिलीजमध्ये आयुष्मान आयब्रो स्लिट (कट असलेली भुवई) सोबत दिसतोय.  चर्चेत आलेल्या या लुकविषयी आयुष्यमान ने सविस्तर माहिती सांगितली. 

‘अनेक’ मध्ये जोशुआची भूमिका साकारणारा आयुष्मान म्हणतो, “हे माझे खरोखर भाग्य आहे की मला नेहमीच अशा दिग्दर्शकांसोबत काम करण्याची संधी मिळाली जे मी दिलेल्या सल्ल्यांना गांभीर्याने घेतात व त्याचा विचार करतात. मी अनुभव सरांशी अनेक मधील भुवयांच्या स्लिट लूकबद्दल चर्चा केली. प्रेक्षकांनी मला पूर्णपणे नवीन रूपात पहावे अशी माझी इच्छा होती. हा लूक लोकांना आवडतोय व त्याची खूप चर्चा होतेय याचा मला आनंद आहे” 

Ayushmann Khurrana with Director Anubhav Sinha
Ayushmann Khurrana with Director Anubhav Sinha

आयुष्मान आपल्या दिग्दर्शकांना आपल्या कल्पना सांगण्यात मागे कधीच नसतो आणि अलीकडच्या काळात तर त्याने बर्‍याचदा असे केले आहे. तो म्हणतो , “मी नेहमीच अशा गोष्टींबद्दल मनात विचार करतो आणि मग त्याबद्दल माझ्या दिग्दर्शकास सांगतो. आयुष्यमान म्हणतो की “मी अनुभव सरांचा आभारी आहे की त्यांनी माझी सूचना मनापासून स्वीकारली आणि अशा गोष्टींमुळेच आमची पार्टनरशीप रंगतदार बनते. माझ्या व्यक्तिरेखेचा लूक चांगला कसा बनेल याची मी एक कलाकार म्हणून नेहमीच काळजी घेत असतो. तुम्ही पाहिलेच असेल की ‘शुभमंगल ज्यादा सावधान’ मध्ये माझे पात्र नाकातील अंगठी घालते. ही कल्पना मी हितेश (केवल्य) आणि आनंद राय सरांसमोर ठेवली आणि त्यांनी ती लगेचच स्वीकारली. त्याचप्रमाणे ‘गुलाबो सीताबो’ चित्रपटात मी तोतरे बोलण्याचा सल्ला दिला होता  जो शुजित सरांना खूप आवडला.” 

आयुष्मान म्हणतो, “मला माझा मुद्दा मोकळेपणाने सांगायला आवडतो आणि मी हे कृतज्ञतापूर्वक कबूल करतो कि मला नेहमीच माझ्या सूचनांना महत्त्व देणार्‍या चित्रपट निर्मात्यांसोबत काम करण्याची संधी मिळाली आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.