आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Zindagi Tere Naam’ song from the Movie ‘Rashmi Rocket’ released! तापसी पन्नू अभिनीत झी5 ओरिजिनल ‘रश्मी रॉकेट’ 15 ऑक्टोबरच्या प्रदर्शनाची तारीख जवळ येत आहे आणि प्रत्येक दिवसाबरोबर चित्रपटातून दररोज काहीतरी नवनवीन समोर येत आहे ज्याने प्रत्येकजण अधिकाधीक उत्साही होत आहे. निर्मात्यांनी आता आणखी एक गाणे ‘जिंदगी तेरे नाम’ लाँच केले आहे ज्यात तापसी पन्नू आणि प्रियांशु पैन्युली आहेत.

‘जिंदगी तेरे नाम’ ही भावनिक रचना आहे जी प्रत्येकाच्या हृदयाला स्पर्श करेल! गायन आणि संगीत अमित त्रिवेदी यांनी संगीत आणि आवाज दिलेल्या, प्रेम आणि जीवनावर बनवण्यात आलेले हे गाणे पुन्हा एकदा जादू निर्माण केली आहे. अमित त्रिवेदीच्या चाहत्यांसाठी एक मेजवानी, ‘जिंदगी तेरे नाम’ तुम्हाला नक्कीच मंत्रमुग्ध करेल. कौसर मुनीर यांनी लिहिलेल्या गीतांसह अमित त्रिवेदीच्या आवाजाने या गाण्याला चार चाँद लावले आहेत.

‘जिंदगी तेरे नाम’ त्या सर्व जोडप्यांना समर्पित आहे जे अपयशातून जाताना देखील एकत्रितपणे सर्व आव्हानांना सामोरे जातात. हे गाणे रश्मी (तापसीने साकारलेले) वर सुंदरपणे चित्रित केले आहे, ती तिच्या व्यावसायिक जीवनात कठीण काळातून जात आहे, ज्याचा परिणाम तिच्या वैयक्तिक आयुष्यावर देखील होतो आहे, मात्र तिचा जोडीदार (प्रियांशुने साकारलेला), या कठीण काळात देखील तिच्यासोबत ठामपणे उभा आहे.

तापसी पन्नूने आपल्या सोशल मीडिया हँडलवर गाणे शेयर करताना लिहिले, “Tu jo dagmagaya saathi… saath hum bhi tham gaye… #ZindagiTereNaam #RashmiRocket Music:
@ItsAmitTrivedi Lyrics: @KausarMunir Singer: @ItsAmitTrivedi @ZeeMusicCompany”

सॉन्ग लिंक –

रोनी स्क्रूवाला, नेहा आनंद आणि प्रांजल खंडड़िया यांच्याद्वारे निर्मित, ‘रश्मी रॉकेट’ नंदा पेरियासामी, अनिरुद्ध गुहा आणि कनिका ढिल्लों द्वारा लिखीत आहे. यामध्ये सुप्रिया पाठक, अभिषेक बनर्जी, प्रियांशु पेन्युली आणि सुप्रिया पिळगांवकर देखील मुख्य भूमिकेत असणार आहेत. ‘रश्मि रॉकेट’ 15 ऑक्टोबरला झी5 वर प्रदर्शित होत आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.