आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

एसएस राजामौली यांच्या दिग्दर्शनातील आगामी ‘आरआरआर’ बहुप्रतीक्षित आणि बहुप्रत्याशित पॅन-इंडिया चित्रपट आहे. निर्मात्यांनी चित्रपटवरील आणखी एक ताज्या अपडेटची घोषणा करत सांगितले की, चित्रपटाचे विशाल थीम गीत ‘दोस्ती’ 1 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात येणार आहे. (The First Song from RRR Movie on August 1st)

चित्रपटाच्या टीमने आपल्या सोशल मीडियावर शेअर केले की, “The First Song from #RRRMovie on August 1st, 11 AM. #Dosti  An @mmkeeravaani Musical. Sung by @ItsAmitTrivedi .
Lyrics by @MsRiyaMukherjee.

आज निर्मात्यांनी या चित्रपटाच्या टायटल सॉंगबाबत खुलासा केला कि या चित्रपटाच्या टाइटल सॉन्गसाठी भारतातील सर्वोत्तम गायकांना एकत्र आणण्यात येणार आहे, ज्याने सर्वांचीच उत्सुकता ताणली आहे.

त्यांनी लिहिले, “5 Languages.
5 Leading Singers.
India’s finest voices panning across regions join hands to Sing & Shoot a Music Video for #RRRMovie theme song
An @MMKeeravaani Musical.”

Announcement at 11 AM.

भूषण कुमार यांची टी-सीरीज आणि लहरी म्यूझिकला आता या मैग्नम ओपस आरआरआरच्या संगीताचे हक्क मिळाले आहेत.

स्वतंत्रता पूर्व भारतातील पार्श्वभूमीवर, हा चित्रपट प्रसिद्ध स्वतंत्रता सेनानी, कोमाराम भीम आणि अल्लूरी सीतारामराजू यांच्या तरुणपणातील आयुष्यावर एक काल्पनिक कहाणी आहे. एक ब्लॉकबस्टर, चित्रपटाचे निर्माता पोस्टर आणि नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘आरआरआर’च्या जगाच्या झलकेने जिज्ञासूंची उत्सुकता ताणण्यात यशस्वी झाला असून हा चित्रपट तितकाच भव्य दिव्य असून एक मोठा ब्लॉकबस्टर असणार आहे, हे आश्वासित करण्यात देखील यशस्वी झाला आहे.

‘आरआरआर’ भारतातील सर्वात भव्य दिव्य फिल्म असून यामध्ये सर्व भाषांमधली स्टारकास्ट समाविष्ट आहे. डीवीवी दानय्या द्वारा डीवीवी एंटरटेनमेंट बॅनर निर्मित, या चित्रपटाची निर्मिती 450 करोड रुपयांच्या मोठ्या बजेटवर करण्यात आली आहे.

पेन स्टूडियोजने पूर्ण उत्तर भारतातील नाट्य वितरण अधिकार मिळवले असून सर्व भाषांमधील विश्वव्यापी इलेक्ट्रॉनिक अधिकार देखील विकत घेतले आहेत. पेन मरुधर या चित्रपटाला नॉर्थ टेरिटरीमध्ये वितरित करणार आहेत. हा चित्रपट तेलुगु, हिंदी, तमिळ, मलयाळम आणि कन्नड यांच्यासाहित अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होण्यासाठी तयार आहे.

कोविड परिस्थिती लक्षात घेऊन ‘आरआरआर’ जगभरात 13 ऑक्टोबर 2021 ला प्रदर्शित होणार आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.