आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Character actor Mithilesh Chaturvedi passed away. बॉलिवूडचे प्रसिद्ध चरित्र अभिनेते मिथिलेश चतुर्वेदी यांचे निधन झाले आहे. मिथिलेश यांना अनेक दिवसांपासून हृदयविकाराचा त्रास होता. मिथिलेश चतुर्वेदी यांचे जावई आशिष चतुर्वेदी यांनी सोशल मीडियावर मिथिलेश यांचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाल्याची पुष्टी केली आहे. १५ ऑक्टोबर १९५४ रोजी लखनौमध्ये जन्मलेले मिथिलेश चतुर्वेदी 68 वर्षांचे होते.

आशिष चतुर्वेदी यांनी पुष्टी केली की त्यांच्या सासऱ्यांचा मृत्यू लखनऊमध्ये नव्हे तर मुंबईत झाला. लखनौ हे मिथिलेश चतुर्वेदी यांचे जन्मस्थान आहे, मात्र ते अनेक दिवसांपासून मुंबईत राहत होते. आशिषने सांगितले की, मिथिलेश चतुर्वेदी यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते म्हणतात, ‘गेल्या १० दिवसांपासून त्यांच्यावर कोकिलाबेन हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू होते. १० दिवसांपूर्वी त्यांना हृदयविकाराचा झटका आला होता, त्यानंतरच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. आज पहाटे ४ वाजता त्यांना पुन्हा हृदयविकाराचा झटका आला, त्यामुळे त्यांचे निधन झाले.’ 

मिथिलेश यांनी आपल्या करिअरमध्ये अनेक उत्तमोत्तम चित्रपटांमध्ये काम केले होते. मिथिलेश चतुर्वेदी यांनी  सनी देओलचा सुपरहिट चित्रपट ‘गदर: एक प्रेम कथा’, मनोज बाजपेयीचा ‘सत्या’, शाहरुखचा ‘अशोका’ यासह ‘ताल’, ‘बंटी और बबली’, ‘क्रिश’ आणि ‘रेडी’, ओटीटीवर रिलीज झालेली ‘स्कॅम 1992’ मध्ये भूमिका साकारल्या होत्या. याशिवाय ‘कोई… मिल गया’ या चित्रपटातील त्यांच्या कामाचे कौतुक झाले होते. टीव्हीवरील ‘नीली छत्री वाले’मध्ये त्यांनी सर्वांची मने जिंकली होती.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.