आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

राकेश ओमप्रकाश मेहरा एक असे नाव आहे जे मागील काही वर्षांपासून बॉलीवुडच्या अनेक उत्तम कालाकृतींसोबत जोडले गेले आहे. बहुआयामी लेखक-दिग्दर्शक, ज्यांनी इंडस्ट्रीला ‘रंग दे बसंती’, ‘दिल्ली 6’, आणि ‘भाग मिल्खा भाग’ सारख्या अनेक उत्तम चित्रपट दिले असून आता आपले आत्मचरित्र, द स्ट्रेंजर इन द मिरर च्या अनावरणासाठी सज्ज झाले आहेत, ज्याच्या मुखपृष्ठाचे अनावरण सोनम कपूर हिच्या हस्ते करण्यात आले. (Sonam Kapoor unveils the cover of Rakeysh Omprakash Mehra’s debut book, ‘The Stranger In The Mirror’)

आत्मचरित्राचे फ़ॉरवर्ड ए. आर. रहमान यांनी लिहिले आहे ज्यांनी दिग्दर्शकासोबत ‘रंग दे बसंती’ आणि ‘दिल्ली 6’ सारखे दोन चित्रपट केले आहेत. पुस्तकासाठी ‘आफ्टरवर्ड’ आमिर खानने लिहिले आहे. सोनम आणि राकेश समीक्षकांद्वारे गौरवलेला चित्रपट ‘दिल्ली 6’ आणि ‘भाग मिल्खा भाग’ साठी एकत्र आले होते.

अभिनेत्रीने आता आपल्या सोशल मीडिया हँडलवर आपल्या पूर्व-दिग्दर्शकाच्या पुस्तकाच्या मुखपृष्ठाचे अनावरण केले, ज्याला तिने कॅप्शन दिले आहे, “FIRSTLOOK”

मेहरा इंडस्ट्रीतील कोणत्याही अभिनेत्यासाठी एक बेहतरीन मेंटर आहेत. स्क्रीनवर त्यांचा उत्साह आणि दृष्टि समजून घेणे, खरोखरच एक जादुई अनुभव असेल! आता ते #TheStrangerInTheMirror च्या माध्यमातून आपल्या दृष्टिकोनाला आणि आजवरच्या प्रवासाला सार्वत्रिक करत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonam K Ahuja (@sonamkapoor)

रीता राममूर्ति गुप्ता या पुस्तकाच्या सह-लेखिका असून यामध्ये भारतीय सिनेमा आणि जाहिरात विश्वातील काही दिग्गज नावे- वहीदा रहमान, ए आर रहमान, मनोज बाजपेयी, अभिषेक बच्चन, फरहान अख्तर, सोनम कपूर, रवीना टंडन, रोनी स्क्रूवाला, अतुल कुलकर्णी, आर. माधवन, दिव्या दत्ता आणि प्रहलाद कक्कड़ सामील आहेत.

हे पुस्तक 27 जुलैपासून संपूर्ण भारतात उपलब्ध होणार असून 20 जुलैपासून प्री-आर्डर करता येऊ शकेल. वर्तमानातील सर्वश्रेष्ठ दिग्दर्शक-लेखकाच्या अंतर्दृष्टिला समजून घेण्यासाठी हे पुस्तक वाचणे आवश्यक आहे.

हेही वाचा – ‘प्लॅनेट मराठी’च्या अक्षय बर्दापूरकर यांना ‘महाराष्ट्र सन्मान’ पुरस्कार

Website | + posts

Leave a comment