आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Legendary actor Ashok Saraf launched the trailer of the marathi movie ‘Baipan Bhari Deva’

जिओ स्टुडिओज प्रस्तुत आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच सोहळा नुकताच दिमाखात पार पडला. मराठी चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेते श्री. अशोक सराफ यांच्या हस्ते ‘बाईपण भारी देवा’ चित्रपटाचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या ट्रेलर लॉंच सोहळ्याला दिग्दर्शक केदार शिंदे, स्टारकास्ट रोहिणी हट्टंगडी,वंदना गुप्ते,दीपा परब चौधरी,शिल्पा नवलकर,सुकन्या कुलकर्णी मोने, गायिका सावनी, संगीतकार साई – पियूष सह सिनेमाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

पारंपरिक मंगळागौर नृत्याचा आनंद कलाकार आणि मिडिया यांनी घेतला. खेळी मेळीच्या वातावरणात बाईपण भारी देवाचा ट्रेलर लाँच सोहळा जोरदार पार पडला. 

जिओ स्टुडिओज प्रस्तुत, माधुरी भोसले आणि जिओ स्टुडिओज निर्मित, बेला शिंदे-अजित भुरे सह-निर्मित आणि केदार शिंदे दिग्दर्शित ‘बाईपण भारी देवा’ हा चित्रपट आपल्या भेटीसाठी सज्ज झाला आहे. ‘बाईपण भारी देवा’ ३० जून, २०२३ रोजी पासून चित्रपटगृहात प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment