आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

आज, लव फिल्म्सने भारतीय क्रिकेट लिजेंड सौरव गांगुली यांच्यावरील बायोपिकची घोषणा केली आहे. (Luv Films announces biopic on cricket legend Sourav Ganguly)

सौरव गांगुली, ज्यांना दादा म्हणून ओळखले जाते, जे निर्विवादपणे भारतातील सर्वात यशस्वी आणि विवादास्पद क्रिकेट कॅप्टन्सपैकी एक राहिले आहेत. क्रिकेटसाठी धडधाडणाऱ्या सर्व भारतीयांच्या हृदयात त्यांच्यासाठी एक खास जागा निश्चितच आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Luv Films (@luv_films)

90च्या दशकातील क्रिकेटर ते सध्याच्या भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष होण्यापर्यंत, गांगुली यांना अंतरराष्ट्रीय रेकॉर्ड्ससोबत त्यांचा अनेक विवादास्पद भूमिकेसाठी देखील तितकेच ओळखले जाते. त्यांचे जीवन भारतीय क्रिकेटमधील सर्वात रोमहर्षक नाट्य असून ते मोठ्या पडद्यावर पाहणे दर्शकांसाठी तितकेच रोचक असेल. या बायोपिकचे निर्माण लव रंजन आणि अंकुर गर्ग करणार आहेत.

लव फिल्म्सने ‘सोनू के टीटू की स्वीटी’, ‘दे दे प्यार दे’, ‘मलंग’ आणि ‘छलांग’ सारख्या यशस्वी चित्रपटांची निर्मिती केली असून त्यांच्या आगामी चित्रपटांमध्ये रणबीर कपूर आणि श्रद्धा कपूर अभिनीत लव रंजन यांच्या दिग्दर्शनात बनणारी ‘कुत्ते’ आणि ‘उफ्फ’ यांचा समावेश आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment