आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Slight Improvement in Lata Mangeshkar’s Health says Spokesperson. भारताच्या ज्येष्ठ व दिग्गज गायिका लता मंगेशकर यांच्या टीमने नुकतीच त्यांच्या प्रकृतीविषयी माहिती दिली आहे. कोविड-19 आणि न्यूमोनियाचे निदान झाल्यानंतर त्यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करून आता एक आठवड्याहून अधिक काळ झाला आहे.

लता दीदींच्या जवळची मैत्रिणी असलेल्या अनुषा श्रीनिवासन अय्यर म्हणाल्या, ”लता दीदी च्या प्रकृतीमध्ये आता पूर्वीपेक्षा काहीसा सुधार झाला असल्याची चिन्हे दिसत आहेत आणि डॉ प्रतित समदानी यांच्या नेतृत्वाखालील डॉक्टरांच्या टीमकडून त्यांच्यावर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत. त्या लवकर बऱ्या व्हाव्यात आणि घरी परत याव्यात यासाठी आम्ही प्रार्थना करत आहोत.”

काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर लताजींची तब्येत बिघडल्याच्या बातम्या आल्या होत्या. त्यानंतर, त्यांच्या टीमने त्या ‘स्थिर’ असल्याचे नमूद करून औपचारिक निवेदन जारी केले होते. ‘खोट्या बातम्या प्रसारित होताना पाहून त्रास होतो. कृपया लक्षात घ्या की लता दीदींची प्रकृती स्थिर आहे. सक्षम डॉक्टरांच्या उपचाराखाली त्या ICU मध्ये आहेत. कृपया त्यांच्यासाठी प्रार्थना करा प्रार्थना करा,” असे ते निवेदन होते. 

लता दीदी त्यांच्या एका कर्मचाऱ्याच्या संपर्कात आल्या होत्या, जो कोविड-19 पॉझिटिव्ह होता. मंगेशकर यांच्या प्रकृतीबद्दल समजल्यानंतर, चित्रपटसृष्टीतील अनेक चाहते आणि सदस्यांनी सोशल मीडियावर त्यांना लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment