आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Trailer of Marathi Movie ‘Law of Love’ released, In Cinema on February 4. प्रेमरूपी महासागरात स्वछंदी वावरणारे प्रेमी नेहमीच आपल्याला दिसतात. पण या समाजात आजही असे काही लोकं आहेत जे प्रेम करणाऱ्यांच्या मध्ये “कायदेरूपी” कुंपण घालतात. वेदिका फिल्म क्रिएशन आणि जे. उदय निर्मित “लॉ ऑफ लव्ह” हा सिनेमा असेच काहीसे भाष्य करून जातो. येत्या ४ फेब्रुवारीला हा चित्रपट महाराष्ट्रात  प्रदर्शित होणार असून नुकताच सोशल मीडियाद्वारे याचा ट्रेलर प्रदर्शित झाला आहे. 

चित्रपटाच्या मुख्य भूमिकेत निर्माते जे. उदय असून त्यांच्यासोबत शालवी शाह या अभिनेत्रीने मुख्य अभिनेत्रीची भूमिका पार पाडली आहे. जेष्ठ अभिनेते मोहन जोशी, यतीन कार्येकर, अनिल नगरकर, रवी कदम, योगेश पवार आणि सचिन मस्के तसेच अभिनेत्री प्राची पालवे यांच्यादेखील महत्वाच्या भूमिका आहेत. लॉ ऑफ लव्ह सिनेमाचे संगीत दिग्दर्शक पी. शंकरम असून सिनेमाची २ गाणी नुकतीच प्रदर्शित झाली आहेत. 

Trailer Linkhttps://youtu.be/zKLcwySQk6Q

चित्रपटाच्या ट्रेलर बद्दल निर्माते आणि अभिनेता जे. उदय सांगतात, “प्रेमाच्या महिन्याची सुरुवात प्रेमाच्या सिनेमाने होते ही  आमच्यासाठी महत्वाची बाब आहे. या चित्रपटामुळे तुमचा ‘व्हॅलेंटाईन’ नक्कीच छान होईल याची आम्हाला खात्री आहे.”

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.