आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

World premiere of Amazon Original Movie Gehraiyaan on February 11. अमेझॉन प्राइम व्हिडिओने नुकताच अमेझॉन ओरिजनल मूव्ही गेहराईयांचा ट्रेलर प्रदर्शित केला. शकुन बत्रा यांनी दिग्दर्शित केलेला गेहराइंया हा सिनेमा नात्यांमधील नाट्यावर आधारित असून त्यात गुंतागुंतीची आधुनिक नाती, प्रौढ होणं, काही गोष्टी सोडून देणं आणि आपल्या आयुष्याचं नियंत्रण आपल्या हातात घेणं असं बरंच काही पाहायला मिळणार आहे. या सिनेमात दीपिका पदुकोण, सिद्धांत चतुर्वेदी आणि अन्यया पांडे यांच्या प्रमुख भूमिका असून त्याचबरोबर धैर्य कारवा, नसिरूद्दीन शहा आणि रजत कपूर यांच्याची महत्त्वाच्या भूमिका आहेत. वायकॉम 18, धर्मा प्रॉडक्शन्स आणि शकुन बत्रा यांच्या जॉस्का फिल्म्सची संयुक्त निर्मिती असलेल्या या सिनेमाचा वर्ल्ड प्रीमियर केवळ अमेझॉन प्राइम व्हिडिओवर 11 फेब्रुवारी, 2022 रोजी जगभरातील 240 देशांत होणार आहे.

या सिनेमाविषयी दीपिका पदुकोण म्हणाली, ‘गेहराइंयामधली माझी व्यक्तीरेखा- अलिशा मला खूप जवळची आहे आणि निश्चितपणे मी आतापर्यंत साकारलेल्या सर्वात आव्हानात्मक भूमिकांपैकी एक आहे. एकाचवेळेस मजेदार आणि तितकीच आव्हानात्मक भूमिका साकारण्याची संधी मिळाल्याबद्दल मी कृतज्ञ आहे. प्रत्येक भूमिकेचा संघर्ष, मार्ग, सच्चा, नैसर्गिक आणि आपलासा वाटणारा आहे. प्रेक्षकांना आपलासा वाटेल असा प्रवास घडवण्याचा आमचा प्रयत्न आहे. नातेसंबंध आणि मानवी नात्यांबद्दल भाष्य करण्यात शकुन कुशल आहे. गेहराइंयामध्ये त्यानं सर्वांना आपलीशी वाटेल अशी गोष्ट गुंफली आहे आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून ही गोष्ट जगभरात सर्वांपर्यंत पोहोचणार असल्याचा मला खूप आनंद वाटत आहे.’

गहराइंयांचा ट्रेलर इथे पाहा: 

‘एकप्रकारे मला घरी पर आल्यासारखं वाटतंय,’ सिद्धांत चतुर्वेदी म्हणाला. ‘अभिनेता म्हणून माझा प्रवास अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवरून सुरू झाला आणि गेहराइंयासारखा माझ्यासाठी अभिमानास्पद असलेल्या सिनेमाचं वर्ल्ड प्रीमियर अॅमेझॉन प्राइम व्हिडिओवर होत आहे. माझ्या मते, आपल्या सर्वांचं व्यक्तिमत्त्व थोडंफार झायनसारखंच असतं. त्याच्या महत्त्वाकांक्षा, इच्छा, स्वप्नांप्रती ध्यास आणि अवघड पर्याय समोर आल्यानंतर होणारा संघर्ष सर्वांनाच आपलासा वाटणारा आहे. आपल्या प्रत्येकासाठीच गेहराईयां हा हृदय आणि आत्म्यासाठीचा सिनेमा आहे. या सिनेमाचा प्रीमियमर जागतिक प्रेक्षकांसाठी 240 देशांत होत असल्यानं मी थरारून गेलो आहे. ’

अनन्या पांडे म्हणाली, ‘गेहराइंयाचे सहकलाकार आणि तंत्रज्ञांबरोबर काम करण्यासाठी मला सर्वोच्च आनंद देणारं होतं. शूटिंग कधीच संपू नये असं मला वाटत होतं. गेहराइंयाच्या गोष्टीत एकप्रकारचा वास्तववादीपणा आहे. हा सिनेमा नात्यांची गुंतागुंत उलगडत असला, तरी प्रेमात जाणवणाऱ्या थरारावर, आपला शोध घेण्यावर तसंच मार्ग तयार करण्यावर तो भाष्य करतो. टियाची व्यक्तीरेखा साकारणं मला खूप आवडलं आणि ज्या पद्धतीनं शकुननं प्रत्येक व्यक्तीरेखेच्या पद्धती हाताळल्या आहेत आणि आपल्या अनोख्या मार्गाने आमच्यातलं सर्वोत्तम कसब बाहेर आणलंय ते खरंच असामान्य आहे. प्रेक्षकांना अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून भारतासह जगभरात हा सिनेमा पाहाता येणार आहे याचा मला खूप आनंद झाला आहे. सिनेमाविषयीच्या प्रतिक्रिया आणि संवादांची मला उत्सुकता आहे.’

धैर्य कारवा म्हणाला, ‘जास्तीत जास्त प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं हे प्रत्येक कलाकाराचं स्वप्न असतं आणि अॅमेझॉन प्राइम व्हिडिओच्या माध्यमातून गेहराइयां जगभरात प्रदर्शित होत असल्याचा मला आनंद वाटतो. यामुळे हा सिनेमा सर्व प्रेक्षकांपर्यंत पोहोचेल. असे गुणवत्तापूर्ण कलाकारा आणि निर्मात्यांबरोबर काम करण्याचा अनुभव जबरदस्त होता आणि माझ्या तो कायम लक्षात राहील. प्रेक्षक या सिनेमावर कशी प्रतिक्रिया देतात हे पाहाण्यासाठी मी उत्सुक आहे.’

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2022. All rights reserved.