आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Renowned comedian Raju Srivastav passed away.
दिल्ली: सुप्रसिद्ध विनोदी अभिनेते राजू श्रीवास्तव यांचे आज 21 सप्टेंबर रोजी निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून ते हार्ट अटॅक आल्यानंतर व्हेंटिलेटरवर होते. आज सकाळी त्यांची प्रकृती अचानकपणे ढासळली. त्यांच्या प्रकृतीवर डॉक्टरांचे पथक सातत्याने लक्ष ठेवून होते. 

राजू श्रीवास्तव यांना ९ ऑगस्ट रोजी हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांना दिल्लीतील एम्स रुग्णालयात नेण्यात आले. नंतर, श्रीवास्तव यांच्या टीमने पुष्टी केली की त्यांना वर्कआउट दरम्यान हृदयविकाराचा झटका आला होता. 

राजू श्रीवास्तव, ज्यांना त्यांचे असंख्य चाहते गजोधर या नावाने सुद्धा ओळखत असत. राजू श्रीवास्तव यांचा जन्म 25 डिसेंबर 1963 रोजी भारतातील कानपूर येथे एका मध्यमवर्गीय कुटुंबात झाला. त्यांचे वडील रमेशचंद्र श्रीवास्तव हे बलाई काका म्हणून ओळखले जाणारे कवी होते. उत्तम नक्कल करणाऱ्या राजूला लहानपणापासूनच कॉमेडियन व्हायचं होतं. हिंदी चित्रपटांमध्ये छोट्या भूमिका करून त्यांनी आपल्या करिअरची सुरुवात केली. राजश्री प्रॉडक्शनच्या मैने प्यार किया, अब्बास मस्तान दिग्दर्शित बाजीगर यांसारख्या विविध चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका सुरुवातीच्या काळात लहानसहान भूमिका केल्या होत्या. 

श्रीवास्तव हे १९९३ पासून कॉमेडीच्या दुनियेत कार्यरत होते. कल्याणजी आनंदजी, बप्पी लाहिरी आणि नितीन मुकेश यांसारख्या कलाकारांसोबत त्यांनी देश-विदेशात काम केले आहे. राजू श्रीवास्तव त्यांच्या कुशल मिमिक्रीसाठी ओळखला जात होते. त्यांना खरे यश ग्रेट इंडियन लाफ्टर चॅलेंजमधून मिळाले. या शोमधील त्यांच्या अप्रतिम अभिनयामुळे ते घरोघरी पोहोचले होते. 

२०१३ मध्ये, राजू श्रीवास्तव यांनी त्यांच्या पत्नीसहस्टार प्लस वरील डान्स शो ‘नच बलिए सीझन 6’ मध्ये भाग घेतला. ‘कॉमेडी नाइट्स विथ कपिल’, ‘दि ग्रेट इंडियन लॉफ्टर चॅलेंज’, ‘कॉमेडी का महामुकाबला’, ‘मजाक मजाक में’ सारख्या स्टॅन्ड अप कॉमेडी शोज मध्ये राजू श्रीवास्तव यांच्या विनोदांनी रसिकांना मनसोक्त हसविले. श्रीवास्तव यांनी ‘बिग बॉस’ (हिंदी सीझन ३) मध्येही भाग घेतला होता.

२०१४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी समाजवादी पक्षाने कानपूरमधून श्रीवास्तव यांना उमेदवारी दिली होती. परंतु श्रीवास्तव यांनी तिकीट परत करून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना स्वच्छ भारत अभियानात सहभागी करून घेतले होते. तेव्हापासून ते वेगवेगळ्या शहरात आपल्या कार्यक्रमांतून स्वच्छतेचा प्रचार करत होते. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.