आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक ट्विटर I इंस्टाग्राम

————————

अखेरीस तो दिवस उगवलाच ज्याची ‘राधेश्याम’ आणि प्रभासचे चाहते आतुरतेने वाट पहात आहेत. पॅन-इंडिया स्टार प्रभासने आपल्या सोशल मीडियावर चित्रपटाचे एक पोस्टर शेअर केले आहे, ज्यात तो एक डेपर लुकमध्ये यूरोपातील रस्त्यांवर भटकताना दिसत आहे. पोस्टरमध्ये लिहिले आहे कि चित्रपट येत्या मकर संक्रांति/पोंगलला म्हणजेच 14 जानेवारी 2022 मध्ये प्रदर्शित होईल. (Pan-India star Prabhas reveals release date of his Pan-India film Radheshyam)

कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “Can’t wait for you all to watch my romantic saga, #RadheShyam, which has a brand new release date – 14th January, 2022 worldwide!”

प्रेक्षक मोठ्या आतुरतेने या चित्रपटाची वाट पहात आहेत आणि या बातमीने प्रेक्षकांना अतिशय उत्साहित केले आहे. अनेकांचे असे म्हणणे आहे की हा चित्रपट या वर्षीच्या सर्वात मोठया चित्रपटांपैकी एक असेल आणि प्रभासचे चाहते निश्चितच या घोषणेने आनंदित झाले आहेत.

या चित्रपटसोबत जवळपास दशकभराने प्रभास रोमांटिक शैलीत परतत असून यामध्ये प्रभास आणि पूजा हेगडे यांची नवी जोड़ी पाहायला मिळणार आहे. चित्रपटाचे अनेक पोस्टर्स प्रदर्शित झाले आहेत त्यामधून प्रभास लवरबॉय इमेजमध्ये दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Prabhas (@actorprabhas)

चित्रपट 14 जानेवारी 2022 मध्ये मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. राधेश्याम एक बहुभाषी चित्रपट असून गुलशन कुमार व टी-सीरीज यांच्याद्वारे प्रस्तुत या चित्रपटाचे दिग्दर्शन राधा कृष्ण कुमार यांनी केले आहे. ही यूवी क्रिएशन्सची निर्मिती असून याचे निर्माण भूषण कुमार, वामसी आणि प्रमोद यांनी केले आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.