आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

“Aapdi Thaapdi” Marathi Movie trailer launched, releasing in cinemas on 5th October on the occasion of Dussehra. आगामी बहुचर्चित “आपडी थापडी” या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच लाँच करण्यात आला. ट्रेलरमधूनच चित्रपट मनोरंजक असल्याचं कळत असल्यानं ५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर या चित्रपटाचा सहकुटुंब चित्रपटगृहात आनंद घेता येईल.

के सायलेंटच्या केसी पांडे यांची निर्मिती आणि प्रस्तुती असलेल्या ‘आपडी थापडी’ या चित्रपटाचं दिग्दर्शन आनंद करीर यांचं आहे. सुनीला करीर आणि आनंद करीर यांनी चित्रपटाचं लेखन केलं आहे. श्रेयस तळपदे आणि मुक्ता बर्वे यांच्यासह नंदू माधव, संदीप पाठक, नवीन प्रभाकर, खुशी हजारे अशी दमदार स्टारकास्ट या चित्रपटात आहे. तर सुमन साहू यांनी चित्रपटाचं छायांकन आहे. ‘फॅमिलीचा चित्रपट बघा फॅमिली बरोबर’ अशी टॅगलाईन असलेल्या या चित्रपटात पाटील कुटुंबाची एक मजेशीर गोष्ट उलगडली आहे.

अतिशय कंजुष स्वभाव असलेला सखाराम पाटील अर्थात श्रेयस तळपदे, त्याची पत्नी अर्थात मुक्ता बर्वे आणि त्यांची मुलगी असं पाटील कुटुंब या चित्रपटाच्या केंद्रस्थानी आहे. असा एक प्रसंग घडतो आणि काय धमाल होते याची गोष्ट चित्रपटात आहे. ट्रेलर तर धमाकेदार आहेच पण आता उत्सुकता आहे की पिंकू नक्की आहे तरी कोण ??

५ ऑक्टोबरला दसऱ्याच्या मुहूर्तावर प्रदर्शित होणारा हा चित्रपट सहकुटुंब चित्रपटगृहात जाऊन पाहता येईल. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

 

 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.