आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Vikram Vedha’s second song ‘Bande’ released. हृतिक रोशन आणि सैफ अली खान अभिनित विक्रम वेधा चित्रपटातील ‘अल्कोहोलिया’ या पहिल्या गाण्याने इंटरनेटवर धुमाकूळ घातल्यानंतर निर्माते त्याचे दुसरे गाणे ‘बंदे’ घेऊन प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहे.

आता निर्माते चित्रपटातील नवे ‘बंदे’ हे गाणे घेऊन आले असून हे गाणे श्रोत्यांना विक्रम वेधाच्या दुनियेत घेऊन जाईल, जिथे विक्रमचा सुपर कूल स्वॅग एक पोलीस म्हणून आणि ग्रे गँगस्टर वेधा वेड लावेल. हे गाणे SAM CS द्वारे संगीतबद्ध आणि प्रोग्राम केले असून, शिवमने गायले आहे आणि मनोज मुनताशीर यांनी गीते लिहिली आहेत.

विक्रम वेधा हे गुलशन कुमार, टी-सीरीज आणि रिलायन्स एंटरटेनमेंट यांनी फ्रायडे फिल्मवर्क्स आणि जिओ स्टुडिओ आणि YNOT स्टुडिओ प्रॉडक्शन यांच्या संयुक्त विद्यमाने सादर केले आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन पुष्कर आणि गायत्री यांनी केले असून भूषण कुमार आणि एस शशिकांत यांनी निर्मिती केली आहे. हा चित्रपट 30 सप्टेंबर 2022 रोजी जागतिक स्तरावर मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment