अनन्या पांडे आणि विजय देवेराकोंडाच्या लायगर (Liger) ची घोषणा काही महिन्यांपूर्वी मोठ्या उत्साहात झाली होती. निर्माता करण जोहरने चित्रपटाचे शीर्षक आणि प्रदर्शनाची तारीख दोन्हीची घोषणा केली होती. काल या चित्रपटाचा पॉवर पॅक टीझर रिलीज होणार होता. तथापि, सध्याच्या भारताच्या कोविड परिस्थितीमुळे निर्मात्यांनी ऐन वेळी टीझर रिलीज पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. (Makers of Liger postpone teaser release)

मुख्य अभिनेता विजय देवेराकोंडा, धर्मा प्रोडक्शन्स आणि पुरी कनेक्टिक्स यांच्या संयुक्त निवेदनात म्हटले आहे की, “या काळात तुम्ही सर्व जण घरातच राहून आपल्या स्वतःची आणि तुमच्या प्रियजनांची काळजी घेत असाल याची आम्हाला खात्री वाटते.  आम्ही सर्वजण टीझर रिलीज करण्यासाठी सज्ज होतो. तथापि, आपल्या देशातील सध्याच्या परिस्थिती कडे बघून  आम्ही हे टीझर लॉन्च पुढे ढकलण्याचे ठरविले आहे.”

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.