आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

जॅकलीन फर्नांडीसने आपल्या योलो (यू ओनली लिव वन्स) फाउंडेशन आर्मी डे ऑफ एक्शनची एक झलक शेअर केली आहे. ‘द वेलफेयर ऑफ स्ट्रे डॉग्स’ आणि नंतर ‘द फेलिन फाउंडेशन कम्युनिटी’ला जॅकलीनने भेट दिली असून ‘योलो आर्मी इन एक्शन’ चा एक व्हिडिओ अभिनेत्रीने आपल्या यूट्यूब चॅनलवर शेअर केला. (Jacqueline Fernandez shares a glimpse of her Yolo Foundation Army Day of Action.) 

या मध्ये योलोची संपूर्ण टीम हसतमुख आणि आनंदी दिसते आहे कारण त्यांनी भटक्या जानवरांच्या मदतीसाठी हात दिला आहे. जॅकलीन स्वयंसेवकांच्या टीमसोबत रस्त्यावर उतरली असून भटक्या कुत्र्यामांजराची काळजी घेताना दिसते आहे.

योलोच्या माध्यनातून, जॅकलीनने मुंबई आणि पुणे पुलिस दलांना फेस मास्क आणि सुरक्षा कवच प्रदान केले आहेत. या काळात लहान मुलांची मदत, तसेच गरजूंसाठी भोजन सेवा, योग यांच्यासोबत बरेच काही करत आहे.

जॅकलीनने 3 महीने आधी ‘यू ओनली लिव वन्स फाउंडेशन’ची स्थापना केली असून आपल्या टीमसोबत शेवटपर्यंत आणि तळागाळात उतरून काम करत आहे. योलोने अनेक NGO सोबत जोडून घेतले असून या कोरोना काळात समाजाच्या विविध गरजांची पूर्तता करण्यामध्ये हातभार लावला आहे.

वर्कफ्रंटबाबत बोलायचे झाल्यास, जॅकलीनकडे ‘सर्कस’, ‘भूत पुलिस’, ‘किक 2’, ‘राम सेतु’, ‘अटैक’ आणि ‘बच्चन पांडे’ सारख्या चित्रपटांचा भरणा आहे.

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment