आज वाढदिवसाचा मुहूर्त साधत अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने (Sonalee Kulkarni) आपल्या सोशल मीडियावरून कुणाल बेनोडेकर (Kunal Benodekar) सोबत लग्नबंधनात अडकल्याची घोषणा केली आहे. गेल्या वर्षी याच दिवशी सोनालीने साखरपुडा झाल्याची घोषणा केल्यानंतर सोनाली च्या विवाहाबद्दल बरीच उत्सुकता होती ज्यावर आज तिने पूर्णविराम दिला. (Actress Sonalee Kulkarni Ties Knot with Kunal Benodekar, Announces Marriage)

 

“अब हम 7 मे” म्हणत सोनालीने लग्नाची गोड बातमी शेअर केली आहे.  मागील वर्षी 2-2-2020 मध्ये या सोनाली कुलकर्णीकुणाल बेनोडेकर जोडीचा साखरपुडा पार पडला होता. 

सोनालीने तिच्या इंस्टाग्राम अकाउंट वरून शेअर केलेल्या पोस्टमध्ये ती  म्हणते,

” अब से हम ‘7’ ‘मे’ 👩‍❤️‍👨

So, आम्ही June मध्ये uk ला लग्न करणार होतो
Uk च्या second wave मुळे तारीख पुढे करावी लागली, मग venue च्या availability अनुसार July मधली तारीख ठरली.
Kunal बरोबर बसून लग्नाच्या तयारीसाठी मी March मध्ये shooting संपवून Dubai ला आले, आणि भारतात second wave आली 🙈
Not just मी पुन्हा एकदा दुबईत अडकले पण लग्न बंधनात ही!
April मध्ये UK ने Indians साठी travel ban जाहीर केला. July पर्यंत परिस्थिती बदलणार नाही म्हणून..
Quarantine, travel restrictions, family साठी असणारी risk, एकंदरीत होणारा अनावश्यक खर्च, सरकार चे नियम, या सगळ्यांचा विचार करून आम्ही आमचा भला मोठा लग्न समारंभ cancel करायचा निर्णय घेतला.
June चं July होतंय, म्हणलं postpone करायच्या एैवजी July चं May मध्ये prepone करून सगळ्यांनाच सुखद धक्का देऊ.
आम्ही आता एकत्र एका देशात आहोत, पुढे कधी काय होईल माहीत नाही. जगभरातली परिस्थिती पाहता आता एकमेकांची तब्येत जपून ‘लग्न’ जास्त महत्वाचं आहे ना की ‘समारंभ’. आपल्या देशात इतकी बिकट परिस्थिती असताना आम्ही कुठलंही celebration करूच शकत नाही, तो खर्च वाचवून कोणाला मदत करता यावी या सारखं भाग्य नाही🙏🏻
आई-बाबांचा होकार घेऊन लगेच तयारीला लागलो. माझे आई-बाबा भारतात, कुणाल चे लंडन ला, कधी पुन्हा सगळे एकत्र येतील माहीत नाही…आताच शिक्का मोरतब करून टाकू.
२ दिवसात सगळं ठरवलं.
एका तासात खरेदी आणि
१५ mins मध्ये ४ लोकांच्या साक्षीने मंदीरात,
( इथे Covid restrictions मुळे तेवढंच शक्य आहे) वरमाळ, मंगळसूत्र, कुंकू केवळ या ३ गोष्टी करून
( लग्नाच्या मान्यतेसाठी मंदीराकडून प्रमाणपत्र मिळवण्यासाठी आवश्यक असणाऱ्या विधी)
Marriage Certificate वर sign केलं.
इथे सगळ्या process आणि paperwork मध्ये आम्हाला मदत करणारे @rahultulpule @deepalitulpule यांचे आभार🙏🏻
आमचे foster parents @sachin_narhar_joshi @shriya_joshi_sona
आणि हे सगळं घडवून आणणाऱ्या @madhaviamdekar @kolumbusim चे ही मनापासून आभार🙏🏻
पुढे जेव्हा, जिथे, जसं शक्य होईल,
तेव्हा, तिथे, तसं, family & friends बरोबर सगळ्या विधीनिशी आमची dream wedding करूच.
तोवर, आणि कायम तुमचा प्रेम आणि आशिर्वाद असूद्या 🙏🏻

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

 

 

 

View this post on Instagram

 

A post shared by Sonalee Kulkarni (@sonalee18588)

सोनाली कुलकर्णी बेनोडेकर व कुणाल चे चे खूप खूप अभिनंदन आणि पुढील वैवाहिक जीवनासाठी मंगलमय शुभेच्छा.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.