अभिनेत्री पल्लवी जोशी (Pallavi Joshi) आणि दिग्दर्शक विवेक रंजन अग्निहोत्री (Director Vivek Ranjan Agnihotri) यांनी कोव्हिड-19 (Covid-19) साथीच्या आजाराने पीडित झालेल्या मुलांना आणि कुटुंबांना दत्तक घेण्यासाठी एका एनजीओशी हातमिळवणी केली आहे. कोव्हिड-19 मुळे भारत इतिहासातील सर्वात वाईट टप्प्यातून जात असताना, सर्व देशातील आरोग्याच्या पायाभूत सुविधांना आणि त्याच्या अर्थव्यवस्थेला चाप बसला आहे, तरी मदत कार्यासाठी सिनेसृष्टीतील हे जोडपे पुढाकार घेत आहे. (Pallavi Joshi and Vivek Agnihotri to start Initiative of Adopting the children and famillies affected by Covid-19)

अभिनेत्री पल्लवी जोशी आणि तिचे चित्रपट निर्माते पती श्री विवेक रंजन अग्निहोत्री हे जोडपं कोव्हिड-19 मुळे अनाथ झालेल्या मुलांसाठी, तज्ञांच्या अध्यक्षतेखाली समुपदेशन सत्र आयोजित करत आहेत. हे जोडपे आय एम बुद्धा फाउंडेशन चालवित आहेत, ज्याद्वारे ते चित्रपट क्षेत्रातील, कोरोना महामारीने ग्रस्त असलेल्या व्यक्तींना मदत करत आहेत. या संदर्भात पल्लवी जोशी म्हणतात की, “या समुपदेशन सत्राचे लक्ष्य लहान मुले आणि किशोरवयीन मुले आहेत, ज्यांनी कोरोनाच्या या संकटकाळात आपले एक किंवा दोन्ही पालक गमवल्याने, मानसिक त्रासाला सहन करत आहेत.

यासाठी या जोडप्याने ”नॅशनल कमिशन फॉर प्रोटेक्शन ऑफ चाईल्ड राईट्स (एनसीपीसीआर)” महिला व बालविकास मंत्रालयाच्या अंतर्गत काम करणाऱ्या भारतीय बाल हक्क संरक्षण आयोग बरोबर करार केला आहे. विवेक अग्निहोत्री म्हणतात की, मुलांचे मानसशास्त्रज्ञां कडून सुयोग्य देखरेखीखाली अत्यंत कौशल्यपूर्वक सत्रे घेतली जातात. “आम्ही अशा मुलांचाही विचार करत आहोत ज्यांचे कुटुंब विलग्नवासात आहेत कारण कधी कधी भावनात्मक उथळपणामधून जात असलेल्या मुलांशी वागताना, त्यांना हाताळताना बहुतेक वेळा नातेवाईक कमी पडतात. अशा मुलांची चिंता आणि राग अनुभवण्याची सुद्धा एक पद्धत असते, कारण त्यांचा सांभाळ नातेवाईक किंवा जवळचे परिजन करत असतात.

कोव्हिड-19 सर्व देशभर पसरल्याने अश्यावेळी लहान पुढाकार हजारो लोकांचे जीव वाचवू शकेल आणि हे जोडपे त्यांचे कार्य करत आहेत. पल्लवी आणि विवेक एनजीओसमवेत सध्याच्या परिस्थितीमुळे पीडित असलेल्या मुलांची आणि कुटूंबाच्या मदतीवर भर देत आहेत.

Website | + posts

Leave a comment