ALTBalaji आणि  ZEE5 ची आगामी ’पौरशपुर’ ही वेब सिरीज तिच्या चमकदार पोस्टर व मनोरंजक टिझर मुळे चांगलीच चर्चेत आहे. IMDB या नामांकित वेबसाईटच्या सर्वात लोकप्रिय शो च्या यादीत याने अव्वल स्थान प्राप्त केले आहे. याला २८.४% पेज व्यूह मिळाले आहेत जे या यादीत सर्वात जास्त आहेत. बॉलिवूड व ओटीटी दुनियेतील मोठी नावे कुली नंबर 1 (13.2%), इंदु की जवानी (8.7%), दुर्गामती (6.1%), तोरबाज़ और बच्चन पांडे (5.5%) यांना मागे टाकत ’पौरशपुर’ पहिल्या क्रमांकावर जाऊन पोहोचले आहे. या सिरीज मध्ये अन्नू कपूर, मिलिंद सोमण,  शिल्पा शिंदे,शाहीर शेख, साहिल सलाथिया, पोलोमी दास, आदित्य लाल आणि अनंत विजय जोशी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. 

१६ व्या शतकातील भारताची पार्श्वभूमी असलेल्या ‘पौरशपुर’ मध्ये आपल्यासाठी प्रेम, वासना, रक्ताने भिजलेल्या तलवारी, लिंगभेद इत्यादी बाबींचा उहापोह करतांना सोबतीला सुपरहिट संवाद व तगडी स्टार कास्ट दिसणार आहे. एक असे राज्य, जेथे स्त्रियांना इच्छेची वस्तू मानली जाते आणि पुरुषांची संपत्ती मानली जाते. एक विषारी राजवंश,जेथे महिला राज्यात पुरुषांनी केलेल्या कोणत्याही मागणीस नकार देऊ शकत नाहीत.

८ डिसेंबर रोजी रिलीज होणाऱ्या ट्रेलरसाठी बघत रहा ALTBalaji आणि  ZEE5  

आज रिलीज झालेले ट्रेलर बघा इथे –  

 

 

Website | + posts

Leave a comment