गेल्या नऊ महिन्यांपासून कोविडच्या महामारीमुळे नाटय व्यवसाय संपूर्णत: ठप्प झाला होता तो पूर्ववत सुरु करण्याच्या दृष्टीने जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघाने’ सतत प्रयत्न सुरु ठेवले. प्रयत्नाला यशही आले. जागतिक मराठी नाट्यधर्मी निर्माता संघाच्या वतीने सर्व प्रथमत: महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. श्री उद्धवजी साहेब ठाकरे, उपमुख्यमंत्री अजितदादा पवार, महाराष्ट्राचे ज्येष्ठ नेते शरद पवार साहेब, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे साहेब, सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख साहेब, मा.राजसाहेब ठाकरे, ठाणे महापौर नरेश म्हस्के साहेब, पुणे महापौर मुरलीधर मोहोळ साहेब, लोकसभा सदस्य सुप्रियाताई सुळे तसेच ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई, पुणे या सर्व महानगर पालिकांचे आयुक्त या सर्वांचे मन:पूर्वक आभार. कारण नाटक अनलॉक करताना उपरोक्त सर्वांनीच सकारात्मक दृष्टीकोन ठेऊन संपूर्णपणे सहकार्य केले. त्यामुळे सर्व निर्मात्यांना परत एकदा नाटक सुरु करताना फार मोठा दिलासा मिळाला. जागतिक मराठी नाटयधर्मी निर्माता संघ या सर्वांचा खूप खूप आभारी आहे.

१४ मार्च २०२० पासून नाटयगृह बंद झाली. आलेल्या जागतिक संकटावर मात करण्यासाठी काही कठोर पावले सरकारच्या वतीने उचलण्यात आली. आणि आपणा सर्वांचा नाटयकला व्यवसाय ठप्प झाला. व्यवसायावरच पोट असणाऱ्या हजारो बांधवांवर उपासमारीची वेळ आली आणि निर्माता म्हणून आमची त्यांना मदत करण्याची धडपड सुरु  झाली. आमच्या परीने  जितकी जमेल तितकी जास्तीत जास्त मदत आर्थिक तसेच धान्यपुरवठा या स्वरुपात करण्यात आली. पण निव्वळ मदतीवर किती काळ जगणार? व्यवसाय सुरु करणं हेच प्रामुख्याने गरजेचं आहे, हे लक्षात घेऊन संघाने त्यादृष्टीने विचार करून पाऊले उचलण्यास सुरुवात केली.

व्यावसायिक नाटक आणि त्यावर अवलंबून असणारा खूप मोठा वर्ग लक्षात घेऊन प्रायोगिक रंगकर्मी तसेच महाराष्ट्रातील व्यवस्थापक संघाशी संवाद साधून पुढील येणाऱ्या अडचणींविषयी चर्चा केली. लॉकडाऊन काळात OTT प्लॅटफॉर्म हे जिंवत कलेवर येणार फार मोठं संकट असू शकतं याचा अंदाज बांधत खूप गांभीर्याने विचार करून संघाने काही ठोस पावले उचलण्यास सुरुवात केली.

१) दि. १८ सप्टेंबर २०२० रोजी  सांस्कृतिक  मंत्री श्री. अमित देशमुख साहेब यांची भेट घेऊन खूप गांभीर्याने चर्चा करून नाटक अनलॉक करण्याबाबतचा प्रस्ताव आणि सरकारकडून अपेक्षित असणाऱ्या ठोस मदतीची मागणी करण्यात आली. सांस्कृतिक मंत्र्यांची भेट झाल्यावर मा. मुख्यमंत्री यांची भेट घ्यावी व दिलेल्या प्रस्तावातील काही मुद्द्यांबाबत त्यांच्याशी बोलावे असे मा. अमित देशमुख यांनी सुचवले.

२) मा. मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब, तसेच उपमुख्यमंत्री श्री. अजितदादा पवार यांना संघातर्फे नाटक व इतर रंगमंचीय कला सादरीकरणासाठी परवानगी आणि मदत मिळणे बाबतचा प्रस्ताव देण्यात आला. संघाच्या पत्रानंतर मुख्यमंत्र्यांनी एक व्हर्चुअल मिटिंग द्वारे संवाद साधला व त्यात आमच्या मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करू असे सांगितले.

३) दि.४ नोव्हेंबर रोजी मुख्यमंत्री ठाकरे साहेबांनी ५ नोव्हेंबरपासून नाटयगृह ५०% प्रेक्षक उपस्थितीचे बंधन घालून सुरु करण्याची परवानगी दिली. पण ५०% प्रेक्षक उपस्थिती मध्ये येणारे उत्पन्न व होणारा खर्च याची कुठलीच सांगड बसत नव्हती. टी. व्ही. माध्यम व OTT प्लॅटफॉर्म यांच्या पूर्णतः आहारी गेलेला प्रेक्षक वर्ग नाटककलेकडून टिकवून ठेवणं ही फार मोठी जबाबदारी आम्हां निर्मात्यांवरच होती व हे शिवधनुष्य आम्ही उचलण्याचे मनोमन ठरवले.

४ ) सद्यपरिस्थितीत नाटय प्रयोगांसाठी होणारा खर्च हा कमी करणं अत्यावश्यक होते म्हणून शासन मदत तसेच आपणही खर्च कमी करून त्याची सांगड घालावी असे ठरले व आम्ही त्या दृष्टीने जोरदार प्रयत्न सुरु केले.

५) ९ नोव्हेंबर २०२० रोजी मा. राजसाहेब ठाकरे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांच्याशी प्रदीर्घ चर्चा करून असलेल्या अडचणींवर त्यांची मदत मिळवली. त्यांनाही तत्परतेने आमच्या समोरच काही वर्तमानपत्रातील संपादकांना तसेच त्यांच्या संबंधातील वरिष्ठांना फोन करून निर्मात्यांना मदत करण्याची गळ घातली. टोल संबंधीची आमची एक प्रमुख मागणी त्यांनी मा. एकनाथ शिंदे साहेबांना फोनवर सांगितली व त्याचे गांभीर्य विस्तृत केले.

६ ) दि. १५ नोव्हेंबर  २०२० रोजी  मा. एकनाथ शिंदे साहेब यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना टोल माफी का गरजेची आहे हे सांगितले आणि तद्संब्धीच्या गाड्यांचे नंबर त्यांचे मालक याची संपूर्ण माहिती दिली त्यांनी ही तत्परतेने पावले उचली आणि आत्यंतिक आनंदाची गोष्ट अशी की, ७ डिसेंबर २०२० रोजी त्या सर्व वाहनांच्या टोल माफीचे पासेस सुद्धा आम्हाला मिळाले. मा. एकनाथ शिंदे साहेब यांच्या सूचनेनुसार दि. २१ नोव्हेंबर २०२० रोजी ठाणे, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई महानगरपालिकांच्या आयुक्तांच्यां भेटी घेण्यात आल्या आणि पुन्हा एकदा संघाच्या प्रयत्नांना खूप मोठे यश मिळाले. तसेच ठाणे महापौर मा. नरेश म्हस्के साहेब यांचीही भेट घेतली. ७५% भाडे सवलत देऊन नाटयगृहे उपलब्ध झाली आणि आम्ही व्यवसाय सुरु करण्याचा प्रयत्नांना यशस्वी ठरलो.

७) दि. १९ नोव्हेंबर २०२० रोजी पुणे महापौर मा. मुरलीधर मोहोळ साहेब यांची भेट घेऊन त्यांचीही मदत मिळावी ही अपेक्षा ठेवली तर त्यांनीही सकारात्मक प्रतिसाद देऊन पुणे येथील सर्व नाटयगृह तत्परतेने स्वच्छतेचे आदेश देऊन तातडीने उपलब्ध करून दिली.

८) दि. २३ नोव्हेंबर २०२० रोजी ज्येष्ठ नेते मा. शरद पवार साहेब व सुप्रियाताई सुळे यांची भेट घेऊन नाटय व्यवसाय अडचण व मदतीची अपेक्षे संदर्भातील पत्र दिले.

उपरोक्त विस्तृत माहिती आपणा समोर ठेवण्याचे कारण असे की संघाचे कार्य व कार्यपद्धती आपणास कळावे. कार्य व कार्यपद्धती आपणास कळावे. 

(Press Release)

Website | + posts

Leave a comment