प्रेम… प्यार… लव्ह… इष्क… भाषा कोणतीही असो या भावनेत खूप ताकद आहे. प्रेमाला शब्दांत सामावणं तसं कठीणच. प्रेम हे फक्त जोडीदारावरच असतं असं नाही तर कुटुंबातील व्यक्ती किंवा मित्रांवरही असू शकतं. ते कुठेही, कधीही जडू शकतं. प्रेमाची खासियत म्हणजे प्रेम हे बांधून ठेवणारं नसून ते मुक्त करणारं असतं. खरं तर प्रेम व्यक्त करण्यासाठी कोणत्याही खास दिवसाची गरज नसते. तरीही अनेक जण आपल्या प्रेमभावना ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने खास व्यक्तीसमोर व्यक्त करतात. याच खास दिनाचे औचित्य साधून ‘मिनी फिल्म्स’ घेऊन येत आहे ‘लव्ह यू मित्रा’. हा चित्रपट आजच्या तरुणाईला भावणारा, मनोरंजक आणि नवीन विचार मांडणारा असा आहे. या चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला असून वरुण बागला यांनी चित्रपटाची निर्मिती केली आहे. तर सिद्धार्थ साळवी यांनी लेखन केले आहे. ‘लव्ह यू मित्रा’मध्ये पूजा सावंत, गश्मीर महाजनी हे प्रमुख भूमिकेत असून आणखी एका कलाकारचे नाव मात्र अद्यापही गुलदस्त्यात आहे. त्यामुळे आता हा तिसरा कलाकार कोण असणार, हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

“अशा प्रकारचा विषय मराठी सिनेसृष्टीत पहिल्यांदाच हाताळण्यात आला आहे, हा सिनेमा आपण आपल्या कुटुंबासोबत आणि मित्र-मैत्रिणींसोबत नक्कीच पाहू शकता”, अशी प्रतिकिया चित्रपटाच्या दिग्दर्शक मानसी बागला यांनी दिली. तर चित्रपटाचे निर्माता वरुण बागला त्यांच्या अनुभवाबद्दल सांगतात, ”निर्मिती क्षेत्रातील हा माझा पहिला चित्रपट असला तरी माझी संपूर्ण टीम अनुभवी आहे. चित्रपटात पूजा सावंत, गश्मीर महाजनी यांच्यासह एम टाऊनमधील कसलेल्या कलाकारांचा सहभाग आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा खूपच सुखद अनुभव आहे आणि चित्रपटाबद्दल सांगायचे झाले तर ‘लव्ह यू मित्रा’ हा प्रेमाकडे पाहण्याचा नवा दृष्टिकोन देणारा सिनेमा आहे. आजच्या तरुणाईला आवडेल आणि एकविसाव्या शतकातील पुरोगामी आणि प्रयोगशील पिढीला आपलासा वाटेल, असा विषय आणि विचार मांडण्याचा प्रयत्न या चित्रपटाच्या माध्यमातून करण्यात आला आहे.”

दिग्दर्शकीय पदार्पणासाठी पूजानेही मानसी बागला यांना शुभेच्छा दिल्या असून या चित्रपटाची ती आतुरतेने वाट बघत असल्याचेही तिने सांगितले. तर गश्मीर म्हणतो,” ही स्क्रिप्ट वाचतानाच माझ्या मनाला खूप भावली. त्यात एक वेगळेपण आहे. चित्रपटाचा आशय अतिशय प्रगल्भ आहे . मिनी फिल्म आणि संपूर्ण टीमला माझ्या खूप शुभेच्छा!”

चित्रपटाचं नाव आणि पोस्टरवरून त्याविषयी अधिकाधिक जाणून घेण्याची उत्सुकता वाढली आहे हे नक्की. पूजा आणि गश्मिर च्या चाहत्यांसाठी ही एक अप्रतिम भेटच ठरणार आहे. ‘लव्ह यू मित्रा’ची मूळ संकल्पना जरी प्रेमकथेवर आधारित असली तरी हा चित्रपट सर्वांनी आवर्जून पाहावा असा आहे. त्यामुळे आता हा चित्रपट कधी प्रेक्षकांच्या भेटीला येणार, याची उत्सुकता आहे. चित्रपटाचे चित्रीकरण लवकरच सुरू होणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.