प्रेमी जोडपी ज्या दिवसाची वर्षभर आतुरतेने वाट बघत असतात, तो दिवस म्हणजे व्हॅलेंटाईन डे. फेब्रुवारी महिना लागला की सगळ्यांचा व्हॅलेंटाईन डे चे वेध लागतात. आपल्या आयुष्यातील खास व्यक्तीसमोर या दिवशी प्रेमाची कबुली देऊन व्हॅलेंटाईन डे साजरा केला जातो.

अशा या दिवसाचे निमित्त साधून ‘हरीओम’ सिनेमाचे नवीन पोस्ट प्रदर्शित करण्यात आले आहे. अतिशय रोमँटिक वातावरण आणि प्रेमाच्या रंगात रंगलेले हे पोस्टर खूपच सुंदर आणि आकर्षक आहे. पोस्टरमध्ये दिसणारे सिनेमातील मुख्य नायक आणि नायिका असावे असा अंदाज बांधला जात आहे. असे असूनही या दोघांचा चेहरा मात्र दिसत नाहीये. गुलाबांच्या पाकळ्यांमागे आणि फुग्यांमागे त्यांचा चेहेरा लपला आहे. त्यामुळे हे दोघे नक्की कोण आहेत हे अद्यापही समजले नसले, तरी प्रेक्षकांच्या मनात ते जाणून घेण्याची उत्कंठा नक्कीच निर्माण झाली आहे.

hariom marathi movie poster

काही दिवसांपूर्वीच या सिनेमाचे पहिले पोस्टर प्रदर्शित झाले होते. या चित्रपटाच्या टीमने ते पोस्टर छत्रपती शिवाजी महाराजांना समर्पित केले होते. पहिले पोस्टर पाहून हा सिनेमा ॲक्शनपट असेल असा अंदाज लावण्यात येत होता, परंतु आता या सिनेमाचे दुसरे पोस्टर पाहून हा सिनेमा रोमँटिक सिनेमा असावा असे वाटत आहे. मात्र हा सिनेमा एक कौटुंबिक सिनेमा असणार हे नक्की.

‘हरिओम’ या चित्रपटाचे निर्माते हरिओम घाडगे आणि दिग्दर्शक आशिष नेवाळकर असून हा सिनेमा श्रीहरी स्टुडिओची प्रस्तुती असणार आहे. अद्याप सिनेमाच्या प्रदर्शनाच्या तारखेची घोषणा केली नसली तरी हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.