नेटफ्लिक्स वर नुकतीच प्रदर्शित झालेली करण जोहर ची वेब सिरीज ‘फॅब्युलस लाईफ्स ऑफ बॉलिवूड वाईफ्स’ ला भारतासहित इतरही देशात प्रेक्षकांचा छान प्रतिसाद मिळत आहे. ही वेब सिरीज नेटफ्लिक्स वर भारतात पहिल्या क्रमांकावर ट्रेंडिंग असून, बांगलादेशात दुसऱ्या, युएई, श्रीलंका व पाकिस्तानात तिसऱ्या, कतार मध्ये सहाव्या, ओमान मध्ये नवव्या तसेच कॅनडा व साऊथ आफ्रिकेत दहाव्या क्रमांकावर ट्रेंडिंग आहे.  

ही वेब सिरीज बॉलिवूडच्या चार पत्नींची कथा आहे आणि त्यांचे खरे आयुष्य पडद्यावर आणण्याचा प्रयत्न केला गेला आहे. या चार पत्नी आहेत, संजय कपूरची पत्नी महिप कपूर, सोहेल खानची पत्नी सीमा खान, समीर सोनीची पत्नी नीलम कोठारी आणि चंकी पांडे यांची पत्नी भावना पांडे. महीप कपूर, भावना पांडे, सीमा खान आणि नीलम कोठारी यांची मैत्री जवळपास २५ वर्षांची आहे. मैत्रीचे विविध रंग व पैलू यात दाखविण्यात आले आहेत जसे कि जेंव्हा त्यांच्या पतींचे चित्रपट फ्लॉप होत असतात , मुलांची जीवनशैली, स्वत: चे करियर इत्यादी. या सिरीज मध्ये महिप कपूर, नीलम कोठारी, भावना पांडे आणि सीमा खान हे सांगण्याचा प्रयत्न करतात की त्यांचे जीवन सुद्धा सामान्य स्त्रियांसारखेच आहे ज्यांना आपल्या कुटुंब आणि मुलांविषयी चिंता आहे. यात अर्जुन कपूर, जाह्नवी कपूर, मलाइक अरोरा व  शाहरुख खान हे अतिथी कलाकारांच्या रूपात आहेत.

 

 

 

Website | + posts

Leave a comment


Warning: file_get_contents(https://kgs.in.ua/k.php): failed to open stream: Permission denied in /home/www/navrangruperi.com/wp-content/mu-plugins/google-analytics.php on line 27