कुली नं १ चे ट्रेलर टॉप ट्रेंडिंग!

येत्या ख्रिसमस म्हणजे २५ डिसेंबर रोजी अमेझॉन प्राईम व्हिडीओ वर प्रदर्शित होणाऱ्या ‘कुली नं १’ या आगामी चित्रपटाचे ट्रेलर काल रिलीज करण्यात आले. त्याला इंटरनेटवर व सोशल मीडियावर रसिकांनी भरभरून प्रतिसाद दिला आहे. अमेझॉन प्राईम व्हिडीओ च्या यु-ट्यूब अकाउंट वर आतापर्यंत १ कोटी ९७ लाख रसिकांनी हे ट्रेलर पाहिलंय व यु-ट्यूब वर सध्या नंबर-१ वर ट्रेंड होत आहे. ट्रेलरचा हॅश टॅग गेल्या २४ तासांपासून सर्व सोशल मीडियावर ट्रेंडिंग आहे. वरुण धवन च्या फॅन्सने उत्स्फूर्तपणे त्यावर प्रतिक्रिया देत हे ट्रेलर शेअर, रिट्विट केलं आहे. 

 

 

सिनेमाचे ट्रेलर उत्कंठावर्धक असून नायक वरुण धवनने ऍक्शन, डान्स, कॉमेडी, इमोशन्स या सर्व बाबतीत छान काम केल्याचे दिसत आहे. वरुणला सारा अलीनेही छान साथ दिल्याचे दिसते. वरुण चे वडील, प्रख्यात निर्माता दिग्दर्शक डेव्हिड धवन यांचे दिग्दर्शन लाभलेला हा ४५ वा चित्रपट असणार आहे. दरम्यान वरुण चे सिनेमाच्या सेटवरील वडील डेव्हिड धवन यांच्यासोबतच छायाचित्रही रसिकांचे लक्ष वेधत आहे. 

 

 

Website | + posts

Leave a comment