धर्मेंद्र आणि देओल फॅमिली चाहत्यांसाठी चांगली बातमी आहे. गुरु नानक जयंतीच्या शुभ मुहूर्तावर देओल परिवाराने ‘अपने-२’ या आगामी सिनेमाची घोषणा केली असून, ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र पुन्हा एकदा दोन मुले सनी आणि बॉबी देओलसह मोठ्या पडद्यावर दिसणार आहेत. खास गोष्ट म्हणजे यावेळी देओल कुटूंबाची तिसरी पिढी म्हणजेच सनी देओल यांचा मुलगा करण देओलसुद्धा स्टारकास्टचा एक भाग असेल.

सनी देओल यांनी या चित्रपटाची घोषणा करत ट्विट केले- “बाबाजींच्या आशीर्वादामुळे आणि तुमच्या प्रेमामुळे आम्ही पुन्हा एकत्र दिसणार आहोत. यावेळी मला माझे वडील, भाऊ आणि मुलासोबत काम करण्याची संधी मिळतेय त्याबद्दल मी स्वतःला भाग्यवान समजतो. ‘अपने-२’ पुढच्या वर्षी दिवाळीत प्रदर्शित होईल.” २००७ साली आलेल्या सुपरहिट म्युझीकल ‘अपने’ प्रमाणेच याहीवेळी ‘अपने-२’ च्या दिग्दर्शनाची जबाबदारी अनिल शर्मा सांभाळणार आहेत. ‘अपने’ या चित्रपटाद्वारे धर्मेंद्र, सनी आणि बॉबी देओल पहिल्यांदाच एका चित्रपटात एकत्र आले होते. ‘अपने’ ची निर्मिती धर्मेंद्र यांची होती ज्यात शिल्पा शेट्टी आणि कतरिना कैफ या प्रमुख भूमिकेत होत्या. 

 

धर्मेंद्र यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे की- “माझ्या सर्व प्रिय मित्रांनो जोपर्यंत ईश्वराची मर्जी आहे तोपर्यंत आम्ही एकत्र येत राहू. अपने-२ च्या द्वारे देओल कुटुंबाच्या तीन पिढ्या एकत्र येत आहेत.” ‘अपने-२’ दिवाळी २०२१ मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित होईल. मिळालेल्या माहितीनुसार, ‘अपने-२’ या चित्रपटाची शूटिंग पुढील वर्षी मार्चमध्ये सुरू होणार आहे. 
Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.