आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Saawan Kumar Tak, the director of ‘Sanam Bewafa’ and ‘Souten’ passed away. बॉलिवूडमध्ये ‘सनम बेवफा’ आणि ‘सौतन’ सारखे चित्रपट दिग्दर्शित केलेल्या सावन कुमार टाक यांचे आज प्रदीर्घ आजारानंतर निधन झाले आहे. ते ८६ वर्षांचे होते.

गेल्या काही दिवसांपासून बॉलिवूड दिग्दर्शक, निर्माता आणि लेखक सावन कुमार टाक यांची प्रकृती बिघडली होती आणि त्यांच्यावर मुंबईत उपचार सुरू होते. आज सकाळपासून त्यांची प्रकृती अधिक गंभीर झाली होती. त्यांना कोकिलाबेन धीरूभाई अंबानी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांना हृदयाशी संबंधित समस्या होत्या व सोबतच ते फुफ्फुसाच्या आजाराशीही दीर्घकाळापासून झुंज देत होते.  सावन कुमार टाक यांचे पुतणे नवीन कुमार यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले, “सावन जी यांना आज दुपारी ४:१५ च्या सुमारास हृदयविकाराचा झटका आला. अनेक अवयव निकामी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार केले जातील.” 

सावन कुमार यांनी १९६७ साली संजीव कुमार अभिनीत चित्रपट ‘नौनिहाल’ द्वारे निर्माता म्हणून आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. या चित्रपटाला राष्ट्रीय पुरस्कारांमध्ये राष्ट्रपतींचा गौरव मिळाला होता. अभिनेत्री मीना कुमारी यांचा शेवटचा चित्रपट ‘गोमती के किनारे’ (१९७२) द्वारे त्यांनी दिग्दर्शनात पदार्पण केले. त्यांनी गोमती के किनारे, हवस, अब क्या होगा, साजन बिना सुहागन, साजन की सहेली, सौतन, लैला, प्यार की जीत, सौतन की बेटी, सनम बेवफा,  बेवफा से वफा, खलनायिका, चांद का तुकडा यासह अनेक हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. टाक यांचा दिग्दर्शक म्हणून शेवटचा चित्रपट ठरला, २००६ मध्ये आलेला सलमान खान अभिनीत  सावन… द लव्ह सीझन. अभिनेता सलमान खान याने ट्विटर वर सावन कुमार यांना श्रद्धांजली वाहिली. 

आपल्या पहिल्या चित्रपटाबद्दल बोलतानासावन कुमार यांनी २०१२ सालच्या च्या मुलाखतीत ‘द हिंदू’ला सांगितले होते, ‘मी अभिनेता बनण्यासाठी १९६५ मध्ये जयपूरहून मुंबईत आलो. दोन-तीन स्टुडिओमध्ये नशीब आजमावल्यानंतर जेव्हा मला ब्रेक मिळत नव्हता, तेव्हा मी वरपासून सुरुवात करण्याचा निर्णय घेतला. मी माझ्या बहिणीला चित्रपटाच्या निर्मितीसाठी २५,००० रुपये कर्ज देण्याची विनंती केली. माझ्या बहिणींनी नकार दिला पण माझ्या भावजींनी होकार दिला. म्हणूनच मी नौनिहालची निर्मिती केली.

 चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment