झी5 च्या शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म हिपीवर, प्रिन्स-युविका, तनाझ-बख्तियार, चार्ली चौहान, सुरभी चंदना, पारस-माहिरा यांच्यासोबत अनेक लोकप्रिय कलाकार करणार पदार्पण

सेलिब्रिटींमध्ये विवेक दहिया, निती टेलर, अनिका शिरीन, हिमांशी खुराना, डीजे रेयो, तरुण किनरा आणि रितिका बिदानी होणार सहभागी

गेल्या काही आठवड्यात, झी-5 चा शॉर्ट व्हिडिओ प्लॅटफॉर्म हिपीने लोकप्रियतेचा उच्चांक गाठला असून या व्यासपीठावर सामील होत असलेल्या वापरकर्त्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे आणि आता केवळ टीव्ही सेलिब्रिटीच नाही तर सोशल मीडिया स्टार्स, युट्यूबर्स देखील या अ‍ॅपवर सहभागी होताना दिसत आहेत.

सोशल मीडियावरील लोकप्रिय जोडी, ‘प्रिन्स आणि युविका’ यांच्यासोबतच तनाज- बख्तियार आणि पारस- माहिरा या लोकप्रिय जोड्या देखील हिपीवर पदार्पण करत आहेत. सेलिब्रिटी जोडप्यांसोबतच, हिपीमध्ये सामील झालेल्या इतर सेलिब्रिटींमध्ये विवेक दहिया, चार्ली चौहान, सुरभी चंदना, निती टेलर, अनिका शिरीन, हिमांशी खुराना, डीजे रेयो, तरुण किनरा आणि रितिका बिदानी सहभागी होणार आहेत.

हिपीवर हे सेलिब्रिटी आपापले प्रोफाइल तयार करणार असून त्यांचे वैयक्तिक छंद जोपासणारे अनोखे व्हिडिओ ते या मंचावर अपलोड करणार आहेत. प्रिन्स त्याचे फिटनेस व्हिडिओ, आहारातील टिप्स, लिप सिंक आणि स्केचेस त्याच्या चाहत्यांसोबत शेअर करेल. प्रिन्स शेफच्या भूमिकेत दिसणार असून युविका ब्युटी हॅक्स, खाण्याच्या स्पर्धा आणि बरेच काही इथे शेअर करणार आहे. जोडपे म्हणून ते दोघेही अनेक आव्हाने, धमाल मस्ती, चाहत्यांसोबत शेअर करतील आणि या दोघांच्याही चाहत्यांसाठी नक्कीच ही एक उत्तम मेजवानी असेल.

दुसरीकडे तनाझ आणि बख्तियार हे पारशी जोडपे म्हणून कसे जीवन जगतात, लग्नाच्या टिप्स, रूटीन, टंग ट्विस्टर इत्यादीसारखे अनोखे व्हिडिओ शेअर करतील. चार्ली चौहान आपले योग व्हिडिओ, टिप्स आणि इतर गोष्टी सामायिक करताना दिसणार आहे. डीजे रायो संगीत चाहत्यांसाठी अद्वितीय मॅशअप्स, त्याचे नवीन भिन्न केशरचना, जिम, डीजे म्हणून त्याचे जीवन आणि इतर बर्‍याच मनोरंजक गोष्टी हिपीवर शेअर करेल. हिपीच्या माध्यमातून हिमांशी खुरानाच्या चाहत्यांना तिने केलेले बरेच फॅशन व्हिडिओज, ब्युटीशॉट्स, रूटीन मेक-अप हॅक्स आणि सर्व ग्लॅमरस व्हिडिओज पाहता येतील.

याविषयी सांगताना, प्रिन्स आणि युविका आपल्या हिपी पदार्पणाबाबत म्हणाले की, “आम्ही हिपीवर येण्यास अतिशय उत्सुक आहोत. हे एक खूप छान व्यासपीठ आहे जेथे आम्ही दोघेही छोटे छोटे मजेशीर व्हिडिओ अपलोड करू शकतो. आमच्या दोघांच्याही चाहत्यांना या ठिकाणी खरेखुरे मनोरंजन अनुभवता येईल. इतर व्यासपीठावर जे पहायला मिळते ते सामान्यत: रील एंटरटेनमेंट असते, परंतु आम्ही आपल्याला खात्री देतो की हिपी प्लॅटफॉर्मवर आपल्याला पूर्णपणे रिअल मनोरंजन देणार आहोत! इथे आम्ही जे करू ते अतिशय वेगळं असेल. आमचे वास्तविक आयुष्य, केमिस्ट्री, क्रेझी व्हिडिओज सर्व काही या मंचावर आम्ही शेअर करणार आहोत.”

तनाझ आणि बख्तियार यांनी शेअर केले की, “हिप्पीमध्ये सामील होण्यास आम्ही खूप उत्सुक आहोत! विश्वास ठेवा, मनोरंजनासाठी हे एक अतिशय उत्तम व्यासपीठ आहे! आम्हाला हिपीसाठी व्हिडीओज तयार करताना खूप धमाल येते आहे आणि हा आनंद आम्हाला शब्दात व्यक्त नाही करता येणार! आमचे चाहते आमचे झोराष्ट्रीयन व्हिडिओज, प्रांक्स आणि बरेच काही या मंचावर पाहू शकतील. आम्ही एका गोष्टीची खात्री देतो की प्रत्येकासाठी हा एक मजेदार व्यासपीठ असेल! आम्ही इथे शेअर करत असलेले व्हिडिओ नेहमीपेक्षा खूप वेगळे आणि अनोखे असतील.”

विवेक दहिया म्हणतो, “हिपीविषयी मी खूप उत्साही आहे! या व्यासपीठावर मला ज्या प्रकारचे व्हिडिओ बनवायला मिळणार आहेत, त्यावरून तर मी याच्या प्रेमातच पडलो आहे! हे आश्चर्यकारक आणि रोमांचक आहे !! मी एक व्हिडिओ बनवतो आणि त्याच्या पुढचा व्हिडिओ बनवण्यासाठी मी आणखी उत्साही असतो!! अनोखे कंटेंट,एन्टरटेन्मेंट असे बरेच काही. चाहत्यांना इथे बर्‍याच नवीन गोष्टी पाहायला मिळतील. या मंचावर माझे एक नवे व्यक्तीमत्व पहायला मिळणार आहे.”

झी5 ने जेव्हा जाहीर केले की ते त्यांच्या चाहत्यांसाठी स्वत:चा असा एक लघु व्हिडिओ प्लॅटफॉर्म घेऊन येत आहेत तेव्हापासूनच, हा मंच कसा असेल, यावर कशी धम्माल असणार आहे, हे पाहण्याची उत्सुकता सगळ्यांनाच होती. यावर आणखी एक पाऊल पुढे टाकत, हिपीचे हे व्यासपीठ केवळ मजेदारच नाही तर लोकांना त्यांची प्रतिभा दाखवण्याची संधी देणार आहे. हिपी हा एक असा मंच आहे जिथे दर्शक त्यांच्या स्वप्नांचा पाठपुरावा करू शकतील. नुकतीच हिपीवर, हिपी स्टार हंटची घोषणा करण्यात आली होती, ज्याद्वारे दर्शकांना झी5 ओरिजिनल्सच्या ऑडिशन्ससाठी मंच उपलब्ध करून देण्यात आला.

(Press Release)

Website | + posts

Leave a comment