आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Announcement of Marathi Actor Ajay Purkar’s production company. गेली १५ वर्षे नाटक, चित्रपट आणि दूरदर्शन मालिका या माध्यमांतून अजय पूरकर यांचे नाव अनेक गाजलेल्या कलाकृतींशी जोडले गेलेले आहे. इतक्या वर्षांच्या अनुभवानंतर, अजय पूरकर यांनी निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला असून, त्यांनी नुकतीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ ही निर्मितीसंस्था स्थापन केली आहे.

या संस्थेद्वारा नाटक, चित्रपट, दूरदर्शन मालिका यांची निर्मिती करण्यात येणार आहे. तसेच विविध ओटीटी प्लॅटफॉर्मसाठीसुद्धा चित्रपट आणि मालिका यांची निर्मिती होणार आहे. आपल्या मातीतील तरूण प्रतिभावान लेखक, दिग्दर्शक आणि सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे तंत्रज्ञ शोधून उच्च दर्जाचे मराठी चित्रपट तयार करणे, हा ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’चा प्रमुख हेतू आहे. या क्षेत्रात नव्याने येऊ इच्छिणार्‍या लेखकांनीही एसडब्ल्यूएमध्ये रजिस्टर्ड केलेल्या आपापल्या संहिता, या संस्थेकडे घेऊ जाव्यात, असे आवाहन पूरकर यांनी केले आहे. संस्थेतर्फे फक्त मराठी, हिंदी याच भाषांमधून निर्मिती न करता, इतर प्रमुख भारतीय भाषांमधूनही निर्मिती केली जाणार आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ajay Purkar (@ajay.purkar)

या क्षेत्रात कोणतीही व्यावसायिक शिस्त नसते, कॉंट्रॅँक्टमधून फसवणूक होते, कधी कलाकारांकडून भरपूर पैसे मागितले जातात, तर अनेकदा त्यांचे पैसे बुडवलेही जातात. कलाक्षेत्रात येण्यापूर्वी अजय पूरकर हे वकिलीचा व्यवसाय करत असल्याने, त्यांना या गोष्टींची पुरेपूर जाण आहे आणि त्यामुळे या सर्व गोष्टींची काळजी जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्सकडून घेतली जाईल, असा विश्वास या क्षेत्रातील बहुतेक लोकांना वाटत आहे. 

जमदग्नी ऋषी हे मूळपुरुष असल्याने, त्यांच्या नित्यस्मरणासाठी, त्यांचे आशीर्वाद नित्यनेमाने मिळण्यासाठीच ‘जमदग्नीवत्स प्रॉडक्शन्स’ असे आपल्या संस्थेचे नामकरण करणार्‍या, स्वाभिमानी हिंदू असलेल्या, परंपराप्रिय, कलासक्त अजय पूरकर यांच्याकडून या वर्षाखेरीस एका अभूतपूर्व आणि भव्य निर्मितीची घोषणा होणार आहे. 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.