आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

कलर्स मराठी (Colors Marathi) पुन्हा एकदा घेऊन येत आहे प्रेक्षकांना खिळवून ठेवणारा, मराठी टेलिव्हीजनवरचा सगळ्यात भव्य रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन 3 (Bigg Boss Marathi Season 3). बिग बॉस मराठीच्या घरामध्ये साठहून अधिक कॅमेरांच्या नजरकैदेत १५ सदस्य असणार. घरातील सदस्य आणि बाहेरील जग यामधील दुवा म्हणजे कार्यक्रमाचा सूत्रसंचालक. मागील दोन्ही पर्वांमध्ये आपल्या सूत्रसंचालनाच्या अनोख्या पध्दतीमुळे आणि दमदार व्यक्तिमत्वामुळे प्रेक्षकांची मने जिंकणारे आणि मराठी माणसाला नेहेमीच आपलेसे वाटणारे महेश मांजरेकर याही पर्वात सुत्रसंचालकाची महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडणार आहेत. (Bigg Boss Marathi Season 3 is back on COLORS Marathi )

बिग बॉस मराठी सिझन 3 एका दिमाखदार सोहळ्याद्वारे १९ सप्टेंबर रोजी संध्या. ७.०० वा प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. त्यानंतरचे भाग सोम ते रवि रात्री ९.३० वा. कलर्स मराठीवर प्रक्षेपित होतील. बिग बॉस मराठीच्या घरातील सदस्यांची धम्माल मस्ती, एकमेकांबद्दल करत असलेले गॉसिप यावेळेस पहिल्यांदा हे २४ तास VOOT वर बघायला मिळणार आहे. तसेच प्रेक्षक त्यांचे प्रश्न सदस्यांना “तुमचे प्रश्न” आणि संदेश चुगली बूथद्वारे पाठवू शकणार आहेत. कार्यक्रमाचे मूळ भाग प्रेक्षक कधीही VOOT बघू शकतात. 

प्रमुख, प्रादेशिक मनोरंजन (मराठी आणि कन्नडा) वायकॉम 18 रवीश कुमार म्हणाले, “बिग बॉस या कार्यक्रमाने इतक्या वर्षांमध्ये स्वत:चा विश्वासू, हक्काचा असा प्रेक्षकवर्ग मिळवला आहे मग तो मराठी असो हिंदी असो व इतर भाषांमध्ये असो. बिग बॉस कार्यक्रम डिजिटल माध्यमामध्ये देखील अधिक लोकप्रिय असल्याने जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचण्यास सक्षम आहे. बिग बॉस मराठीच्या मागील दोन सिझनप्रमाणे या वर्षीदेखील वाहिनीसोबतच, डिजिटल माध्यमामधील मराठी प्रेक्षकवर्गामध्ये वाढ होईल हे निश्चित.”
 
व्यवसाय प्रमुख- कलर्स मराठी, (वायकॉम18) अनिकेत जोशी म्हणाले, “मागील एका वर्षांपासून कलर्स मराठी बिग बॉस मराठीचे तिसरे पर्व आणण्याचा विचार करत होती. पण आपण सगळेच एका अत्यंत कठीण परस्थितीचा सामना करतोय. आता कुठे परिस्थिति सुधारते आहे. लोक हळूहळू त्यातून बाहेर पडत आहेत. प्रेक्षकांना मनोरंजनासाठी अनेक व्यासपीठ उपलब्ध आहेत. यामुळेच आमची जबाबदारी अधिक वाढते. मराठी प्रेक्षक अतिशय चोखंदळ असून आता त्याची आवड देखील बदलत आहे. हेच लक्षात घेता कलर्स मराठीने या काळात काही वेगळे, दर्जेदार आणि आशयघन विषय हाताळण्याचा प्रयत्न केला आणि तो यशस्वी देखील झाला.”

प्रोग्रामिंग हेड कलर्स मराठी (वायकॉम18), विराज राजे म्हणाले, “गेली दोन वर्ष आपण पँडेमिक आणि लॉकडाउन या परिस्थितीमधून जात आहोत. त्यामध्ये सगळीकडेच आपण बघतो आहे माणसं मानसिकरीत्या दुर्बळ झालेली आहेत आणि अशावेळी आम्ही असा शो घेऊन येत आहोत ज्यामध्ये १५ सदस्य जे घरामध्ये जाणार आहेत ते मानसिकरीत्या खंबीर हवेत. कारण, या खेळात मानसिक स्वास्थ्य आणि मानसिक खंबीरता याची कसोटी लागते. आपण Unlock Entertainment म्हणतो आहे खर ! पण हे १५ सदस्य स्वत:ला १०० दिवसाठी लॉकडाऊन करून घेणार आहेत आणि एक इंटरेस्टिंग खेळ घरात रंगणार आहे. त्यामध्ये प्रत्येकाच मानसिक स्वास्थ्य समजून येईल. जो वाईट काळ आपण अनुभवला आहे, त्यातून उभारी देणारं, खंबीर राहून कसं आपण सकारात्मकरीत्या आयुष्य जगावं हा संदेश देण्याचा आमचा मानस आहे.”

बिग बॉस मराठी तिसऱ्या सिझनचे सूत्रसंचालन देखील महेश मांजरेकर करणार असून याबाबत बोलताना ते म्हणाले, “मागील दोन वर्ष आपल्या सगळ्यांसाठीच खूप कठीण होती. प्रत्येकजण या वादळाला मोठ्या धीराने सामोरी गेलं आणि अजूनही जातं आहे. या सगळ्यामध्ये आता एक आनंदाची गोष्ट म्हणजे मी परत येतोय महाराष्ट्राचा लाडका कार्यक्रम बिग बॉस मराठीचा नवा सिझनं घेऊन. बिग बॉस मराठीच्या येण्याने मी आशा करतो काही क्षणासाठी का होईना प्रेक्षकवर्ग त्यांचं दु:ख विसरेल. एका वर्षानंतर बिग बॉस मराठीचा नवा सिझन येतो आहे उत्सुकता तर नक्कीच आहे. मला खात्री आहे पहिल्या दोन्ही सिझनप्रमाणे हा सिझन देखील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल. मी सहभागी स्पर्धकांना या पर्वाच्या मनापासून शुभेच्छा देतो”.


बिग बॉस मराठी सिझन तिसरा याबाबत बोलताना सीईओ, एंडेमॉल शाइन इंडिया अभिषेक रेगे – म्हणाले, “बिग बॉस या कार्यक्रमाने मराठी टेलिव्हीजन इंडस्ट्रीमध्ये एक बेंचमार्क तयार केला. आणि हेच लक्षात घेता तिसरा सिझन उत्कृष्ट बनविण्यासाठी एंडेमॉल शाइन इंडियाची टीम अधिक जोमाने तयारी लागली आहे. यावेळेसचे टास्क, अनपेक्षित – नवीन ट्विस्ट, फ्रेश कंटेंट प्रेक्षकांना संपूर्ण सिझन मनोरंजन देतील आणि खिळवून ठेवतील.”

करमणूक जगताच्या अधिक बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.