आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Trailer of ‘Ghar Banduk Biryani’ released

सध्या चर्चेत असलेला चित्रपट म्हणजे झी स्टुडिओज आणि नागराज पोपटराव मंजुळे प्रस्तुत, आटपाट निर्मित ‘घर बंदूक बिरयानी’.  टीझरने या चित्रपटाविषयीची उत्सुकता वाढवली आणि ही उत्सुकता शिगेला पोहोचवण्यासाठी आता या चित्रपटाचा ट्रेलर सोशल मीडियावर झळकला आहे. यात नागराज पोपटराव मंजुळे, सयाजी शिंदे, आकाश ठोसर आणि सायली पाटील याच्या प्रमुख भूमिका आहेत.

आशेच्या भांगेची नशा भारी अशी टॅगलाईन असणाऱ्या या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये पोलीस, डाकू यांच्यात चकमक होताना दिसत आहे. यात एका तरुणाचाही सहभाग दिसत आहे. आता यांच्यात नक्की कशावरून ही चकमक सुरु आहे आणि घर, बंदूक आणि बिरयानीचा याच्याशी नेमका काय संबंध, याचे उत्तर प्रेक्षकांना ७ एप्रिल रोजी मिळणार आहे.  ट्रेलरवरून हा एक ॲक्शन चित्रपट असल्याचे कळत असले तरी यात कौटुंबिक कथाही दडली आहे. वैभव देशमुख यांचे बोल लाभलेल्या या गाण्यांना ए. व्ही. प्रफुल्लचंद्रा यांचे  संगीत लाभले आहे.

चित्रपटाबद्दल निर्माते नागराज पोपटराव मंजुळे म्हणतात, ”अतिशय भव्य स्वरूपात हा चित्रपट आता प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. दिसताना खूप ओळखीचा विषय दिसत असला तरी याची कथा खूप वेगळी आहे. मी पडद्यामागे आणि पडद्यावरही काम केले आहे. अनेकांना प्रश्न होता की या चित्रपटाचे नाव असे काय? तर या चित्रपटाचे नाव अतिशय समर्पक असून ते चित्रपट पाहिल्यावरच प्रेक्षकांना कळेल. यात काही मुरलेले कलाकार आहेत काही नवोदित आहेत मात्र सगळ्याच कलाकारांनी जीव ओतून काम केले आहे. प्रेक्षकांकडून मिळणारा प्रतिसाद पाहता चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल, अशी आशा आहे.”

झी स्टुडिओजचे बिझनेस हेड मंगेश कुलकर्णी म्हणतात, ” नागराज मंजुळे यांची कलाकृती ही नेहमीच अनोखी असते. पुन्हा एकदा एक नवीन विषय घेऊन आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहोत. बिर्याणीमध्ये जसे विविध जिन्नस असतात, ज्यांची काही खासियत असते, जी बिरयानीला अधिकच स्वादिष्ट बनवते . तशीच ही बिरयानी आहे.”

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment