आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

‘Thalapathi 67’ stars Sanjay Dutt, Trisha Krishnan, Gautham Menon and Arjun in the cast. अलीकडेच प्रॉडक्शन हाऊस 7 स्क्रीन स्टुडिओने थलापथी विजयसह आपला आगामी चित्रपट ‘थलापथी 67’ची घोषणा केली. या सिनेमाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच सुरू झाले आहे. अशातच, प्रॉडक्शन हाऊसने चित्रपटाच्या कलाकारांची नावे जाहीर केली आहेत ज्यामध्ये संजय दत्त, अर्जुन, गौतम मेनन, मॅथ्यू थॉमस, मन्सूर अली खान आणि त्रिशा कृष्णन यांचा समावेश आहे.

अ‍ॅक्शन थ्रिलर असलेला ‘थलापथी 67’च्या निर्मात्यांनी चित्रपटाविषयी एक रोमांचक अपडेट देऊन दर्शकांची उत्सुकता वाढवली आहे. अशातच, सिनेमाचे शूटिंग सुरु असतानाच मेकर्सने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत या चित्रपटात संजय दत्त सामील झाल्याची घोषणा केली. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले.

“We feel esteemed to welcome @duttsanjay sir to Tamil Cinema and we are happy to announce that he is a part of #Thalapathy67 #Thalapathy67Cast #Thalapathy
@actorvijay sir @Dir_Lokesh @Jagadishbliss”

तसेच, या प्रोजेक्टमध्ये थलापथी विजय सर आणि त्रिशा कृष्णन यांची उत्कृष्ट ऑन-स्क्रीन जोडी पाहायला मिळणार असून, ‘थलापथी 67’या चित्रपटामध्ये हे दोन्ही कलाकार 14 वर्षांच्या दीर्घ कालावधीनंतर पुन्हा एकत्र येत आहेत. याबद्दल प्रेक्षकांना अपडेट देत निर्मात्यांनी सोशल मीडियावर त्रिशा कृष्णनचा एक फोटो शेअर केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले,

“Extremely happy to welcome @trishtrashers mam onboard for #Thalapathy67 #Thalapathy67Cast #Thalapathy @actorvijay sir @Dir_Lokesh @Jagadishbliss”

‘थलापथी 67’हा खरोखरच एक खास प्रोजेक्ट आहे कारण ‘मास्टर’ आणि ‘वरिसु’ या दोन ब्लॉकबस्टर्सनंतर थलापथी विजय सर आणि 7 स्क्रीन स्टुडिओ यांचे तिसरे सहकार्य चिन्हित करतो. तसेच, या सिनेमाद्वारा थलापथी विजय आणि लोकेश कनागराज पुन्हा एकत्र आले आहेत. यांनी यापूर्वी ‘मास्टर’या चित्रपटात एकत्र काम केले असून, हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर हिट ठरला होता.

7 स्क्रीन स्टुडिओच्या ‘थलापथी 67’या चित्रपटाची निर्मिती एसएस ललित कुमार यांनी केली असून, याचे दिग्दर्शन लोकेश कनागराज करणार आहेत. तसेच, या चित्रपटात थलापथी विजय सर, संजय दत्त आणि त्रिशा कृष्णन यांना पाहायला मिळणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2024. All rights reserved.