आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

Salman Khan lends his voice to the new song ‘Jee Rahe The Hum’ from ‘Kisi Ka Bhai Kisi Ki Jaan’.

‘मैं हूं हीरो तेरा’मधील आपल्या शानदार आवाजाने चाहत्यांना वेड लावल्यानंतर, सलमान खान आता आपला आगामी चित्रपट ‘किसी का भाई किसी की जान’मधील नव्या गाण्यासह पुन्हा आपल्या आवाजाने जादू निर्माण करण्यासाठी सज्ज झाला आहे. 8 वर्षांपूर्वी जेव्हा सलमानने ‘हिरो’साठी गाणे गायले होते, तेव्हा अमाल मलिकने संगीतबद्ध केलेले हे गाणे रिलीज होताच ब्लॉकबस्टर ठरले होते. अशातच,आता 2023 मध्ये सलमान खान आणि अमाल मलिक ‘किसी का भाई किसी की जान’मधील ‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह) या रोमँटिक गण्यासाठी पुन्हा एकत्र आले आहेत. हे गाणे मंगळवार, 21 मार्च रोजी प्रदर्शित होण्यासाठी सज्ज आहे.

निर्मात्यांनी आज ‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह)चा टीझर सोशल मीडियावर प्रदर्शित केला आहे. या गाण्याचे व्हिज्युअल आणि ट्यून पाहून ‘किसी का भाई किसी की जान’च्या संपूर्ण अल्बममधील हे गाणे सर्वोत्कृष्ट गाण्यांपैकी एक असल्याचे दिसते. यामध्ये, सलमान आणि पूजा हेगडेची उत्तम ऑन-स्क्रीन केमिस्ट्रीही पाहायला मिळेल. तसेच, याशिवाय राघव जुयाल, जस्सी गिल आणि सिद्धार्थ निगम यांना देखील स्क्रीनवर पाहायला मिळेल. 

‘जी रहे थे हम’ (फॉलिंग इन लव्ह) हे गाणे ‘नयो लगदा’ आणि ‘बिल्ली बिल्ली’ नंतर ‘किसी का भाई किसी की जान’ अल्बममधील तिसरे गाणे आहे. तसेच, हे गाणे शब्बीर अहमद यांनी लिहिले असून सलमान खानने गायले आहे.

सलमान खान फिल्म्स प्रोडक्शनचा ‘किसी का भाई किसी की जान’या सिनेमाची निर्मिती सलमान खानने केली असून, फरहाद सामजी यांनी दिग्दर्शन केले आहे. तसेच, या चित्रपटात सलमान खान, वेंकटेश दग्गुबाती, पूजा हेगडे, जगपती बाबू, भूमिका चावला, विजेंदर सिंग, अभिमन्यू सिंग, राघव जुयाल, सिद्धार्थ निगम, जस्सी गिल, शहनाज गिल, पलक तिवारी आणि विनाली भटनागर यांच्या भूमिका आहेत. अशातच, अ‍ॅक्शन, कॉमेडी, ड्रामा आणि रोमान्सने भरपूर असलेला ‘किसी का भाई किसी की जान’हा चित्रपट 2023 च्या ईदला प्रदर्शित होणार असून, जगभरात झी स्टुडिओजद्वारा रिलीज करण्यात येणार आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

[elfsight_twitter_feed id="4"]

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.