इरॉस इंटरनॅशनलने आज ‘हाथी मेरे साथी’ या आपल्या अॅडव्हेन्चर चित्रपटाच्या बहुप्रतिक्षित हिंदी ट्रेलरचे व्हर्च्युअल कॉन्फरन्सद्वारे अनावरण केले. आदल्या दिवशी 3 मार्च रोजी जागतिक वन्यजीव दिनानिमित्त निर्मात्यांनी राणा दग्गुबाती, प्रभू सोलोमन, विष्णू विशाल, श्रिया पिळगावकर आणि झोया हुसेन यांच्या उपस्थितीत चेन्नई आणि हैदराबाद येथे या त्रिभाषीय चित्रपटाचा बहुप्रतिक्षित तामिळ आणि तेलगू ट्रेलर रिलीज केला आणि आज या टीमने ‘हाथी मेरे साथी’ या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर व्हर्च्युअल पत्रकार परिषदेत जाहीर केला.

चित्रपटाच्या तिन्ही आवृत्त्यांमध्ये राणा पूर्णपणे वेगळ्या अवतारात मुख्य पात्र साकारत आहे. ‘हाथी मेरे साथी’च्या हिंदी व्हर्जनमध्ये तो पुलकित सम्राटसोबत मुख्य भूमिका साकारत असून विष्णू विशालसोबत कादान (तमिळ) आणि अरण्या (तेलगू) मध्ये दिसणार आहे. या चित्रपटात श्रिया पिळगावकर आणि जोया हुसेन या प्रतिभावान अभिनेत्रींचाही समावेश असणार आहे. अरण्या आणि कादानच्या ट्रेलरने प्रेक्षकांना मंत्रमुग्ध केले आहे. या ट्रेलरने चित्रपटाची एक छोटीशी झलक शेअर केली आहे, जो 26 मार्च रोजी प्रदर्शित होत आहे.

‘हाथी मेरे साथी’ ही एक अशी कहाणी आहे जी एका माणसाची (राणा दग्गुबाती) कथा सांगते, ज्याने आपले बरेचसे आयुष्य जंगलात घालवून पर्यावरणाचे रक्षण केले. ही माणूस आणि हत्ती यांच्यातील नात्याची ही एक अंतहीन कथा आहे, ज्याची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत.

राणा यांच्यासाठी ही हॅटट्रिक असेल कारण बाहुबली सीरीज आणि द गाझी अ‍ॅटॅक नंतर ‘हाथी मेरे साथी’ हा त्यांचा तिसरा त्रिभाषीय चित्रपट असणार आहे.

इरोस मोशन पिक्चर्स या इरोस एसटीएक्स ग्लोबल कॉर्पोरेशन विभागाने या चित्रपटाची निर्मिती केली असून इरोसला भारतीय चित्रपटसृष्टीतील 40 वर्षांची समृद्ध परंपरा लाभली आहे.

हा पॅन-इंडिया बहुभाषिक चित्रपट आपल्या जवळच्या चित्रपटगृहांमध्ये 26 मार्च 2021 रोजी प्रदर्शित होणार आहे.

पहा ट्रेलर इथे-

Website | + posts

Leave a comment