आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Iconic Lavani Singer of Maharashtra Sulochana Chavan passed away today due to old age. लावणीसम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. 

मुंबई- महाराष्ट्राच्या लावणीसम्राज्ञी व ज्येष्ठ पार्श्‍वगायिका सुलोचना चव्हाण यांचं आज १० डिसेंबर रोजी वृद्धापकाळाने निधन झालं. त्या ९२ वर्षांच्या होत्या. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती खालावली होती. आज दुपारी १२ च्या सुमारास फणसवाडी येथील निवासस्थानी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पश्चात पश्चात धाकटा मुलगा, सून, मोठ्या मुलाची पत्नी, नातवंडे असा परिवार आहे.

सुलोचना चव्हाण या माहेरच्या सुलोचना कदम. त्यांचा जन्म १७ मार्च १९३३ रोजी मुंबईत झाला. मुंबईतील एका चाळीत त्यांचे बालपण गेले. वयाच्या पाचव्या वर्षापासूनच त्या गायला लागल्या.  श्रीकृष्ण बाळमेळ्याच्या माध्यमातून सुलोचना चव्हाण यांचे कलाक्षेत्रात पहिले पाऊल पडले. मेळ्यांच्या सोबतीतच त्यांनी हिंदी, गुजराती आणि उर्दू नाटकात बालभूमिका केलेल्या आहेत.  सुलोचना चव्हाण यांना गायनाचे कोणतेही शास्त्रीय शिक्षण मिळाले नाही. त्याकाळात ग्रामोफोन रेकॉर्ड ऐकून ऐकूनच त्या गायनाचा रियाज करायच्या.

त्याकाळात परिस्थितीशी झगडून त्यांनी गाण्याची कला आत्मसात केली होती. संगीत दिग्दर्शक श्याम बाबू भट्टाचार्य पाठक यांच्याकडे सुलोचनाबाई पहिले गाणे गायल्या. तो चित्रपट हिंदी भाषेतील होता आणि चित्रपटाचे नाव होते “कृष्ण सुदामा”. पहिले गाणे जेंव्हा सुलोचना चव्हाण गायल्या तेंव्हा त्यांचे वय होते अवघे नऊ वर्षे. पार्श्वगायन करताना मोहम्मद रफी, मन्ना डे, शमशाद बेगम, गीता दत्त, श्यामसुंदर यांच्यासारख्या आघाडीच्या गायकांबरोबर गाण्याची संधी त्यांना मिळाली.

वयाच्या सोळाव्या वर्षी गायक मन्ना डे यांच्यासोबत त्या “भोजपुरी रामायण” गायल्या होत्या. मराठी व्यतिरिक्त त्यांनी हिंदी, गुजराती, भोजपुरी, तामीळ, पंजाबी या भाषांमध्ये त्यांनी भजन, गझल असे विविध प्रकारदेखील हाताळले आहेत. सुलोचना चव्हाण यांना १९६५ साली “मल्हारी मार्तंड” या चित्रपटातील पार्श्वगायनासाठी महाराष्ट्र राज्याचा पुरस्कार मिळाला.

सुलोचना चव्हाण यांना मिळालेले पुरस्कार-

1.शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा २००९ सालचा राम कदम कलागौरव पुरस्कार
2.महाराष्ट्र सरकारचा ’मल्हारी मार्तंड’ या चित्रपटाच्या पार्श्वगायनाकरिता १९६५ सालचा पुरस्कार
3.संगीत क्षेत्रातील विशेष कामगिरीसाठी दिला जाणारा महाराष्ट्र शासनाचा वर्ष २०१०चा “लता मंगेशकर” पुरस्कार
4.चिंचवडच्या रोटरी क्लबतर्फे जीवनगौरव पुरस्कार (१७-१-२०१५) 

सुलोचना चव्हाण यांची काही गाजलेली गाणी:

१. नाव गाव कशाला पुसता अहो मी आहे कोल्हापुरची, मला हो म्हणत्यात लवंगी मिरची
२. तरुणपणाच्या रस्त्यावरच पहिलं ठिकाणं नाक्याचं, सोळावं वरीस धोक्याचं
३. पाडाला पिकलाय आंबा
४. फड सांभाळ तुऱ्याला गं आला, तुझ्या उसाला लागंल कोल्हा
५. कळीदार कपूरी पान, कोवळं छान, केशरी चुना रंगला काथ केवडा वर्खाचा विडा घ्या हो मनरमणा
६. खेळताना रंग बाई होळीचा होळीचा, फाटला गं कोना माझ्या चोळीचा
७. कसं काय पाटील बरं हाय का, काल काय ऐकलं ते खरं हाय का?
८. स्वर्गाहुन प्रिय आम्हाला आमचा सुंदर भारत देश, आम्ही जरी एक जरीही नाना जाती नाना वेष
९. मी बया पडली भिडंची, गाव हे हाय टग्याचं
१०. मल्हारी देव मल्हारी
११. नाचतो डोंबारी गं नाचतो डोंबारी
१२. पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा, आई मला नेसव शालू नवा
१३. गोरा चंद्र डागला
१४. मला म्हणत्यात पुण्याची मैना
१५. पावना पुण्याचा आलाय गं
१६. रात्र श्रावणी आज राजसा पाउस पडतोय भारी, पाखरू पिरतीचं लाजुन बसलंय उरी
१७. आई चिडली, बाबा चिडला, काय करू तुझ्यावर माझा जीव जडला
१८. दर रात सुखाची नवसाची, मज झोपच येते दिवसाची
१९. हिरीला इंजिन बसवा
२०. कुठवर पाहू वाट सख्याची, माथ्यावर चंद्र की गं ढळला, अन् येण्याच वखत की गं टळला
२१. दाटु लागली उरात चोळी कुठवर आता जपायचं, औंदा लगीन करायचं
२२. अगं कारभारनी, करतो मनधरनी (सोबत जयवंत कुलकर्णी)
२३. करी दिवसाची रात माझी
२४. तुमच्या नावानं गळ्यात माझ्या बांधा एक डोरलं
२५. जागी हो जानकी
२६. बाई मी मुलखाची लाजरी
२७. राजसा घ्या गोविंद विडा
२८. लई लई लबाड दिसतोय ग
२९. घ्यावा नुसताच बघुन मुखडा
३०. बाळा माझ्या कर अंगाई
३१. श्रीहरी गीत तुझे गाते 

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment