आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Prithviraj Sukumaran to play villain in Pooja Entertainment’s upcoming film ‘Bade Miyan Chhote Miyan’. पूजा एंटरटेनमेंटचा आगामी बहुप्रतीक्षित चित्रपट ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ची घोषणा झाल्यापासून याची चर्चा सर्वत्र आहे. तसेच, या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार असून, चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षक उत्सुक आहेत. अशातच, दर्शकांची उत्सुकता वाढत असतानाच निर्मात्यांनी पृथ्वीराज सुकुमारन यांच्या खलनायकाच्या पत्राचा खुलासा केला आहे.

अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’चा पहिला व्हिडिओ रिलीज झाल्यापासून, या चित्रपटाबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ मुख्य भूमिका साकारणार असून, आता कलाकारांच्या यादीत पृथ्वीराज सुकुमारन यांचादेखील समावेश झाला आहे.

या घोषणेबाबत बोलताना जॅकी भगनानी म्हणाले, “”बडे मियाँ छोटे मियाँ’च्या कलाकारांमध्ये पृथ्वीराज सुकुमारन असणे हि एक उत्कृष्ट बाब आहे. तसेच, त्यांची विरोधक व्यक्तिरेखा चित्रपटात आणखी रोमांच भरेल.”

दिग्दर्शक अली अब्बास जफर म्हणाले, “अत्यंत प्रतिभावान कलाकार पृथ्वीराजसोबत काम करण्यास मी उत्सुक आहे. या अ‍ॅक्शन एंटरटेनरमध्ये असा पॉवरहाऊस परफॉर्मर असणे हा एक अद्भुत अनुभव असेल.”

‘बडे मियाँ छोटे मियाँ’मध्ये पहिल्यांदाच दोन पॉवरहाऊस अ‍ॅक्शन नायकांना पडद्यावर एकत्र पाहण्यासाठी प्रेक्षक उत्सुक असतानाच, चित्रपटाचा कॅनव्हास आणखी रंजक होणार आहे. कारण पृथ्वीराज सुकुमारन या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारणार असून, त्यांच्या उत्कृष्ट अभिनयाने चित्रपटाला एक नवीन आयाम जोडेल.

वाशू भगनानी आणि पूजा एंटरटेनमेंटद्वारा प्रस्तुत ‘बडे मियाँ छोटे मियाँ’ एएझेड (AAZ) फिल्म्सच्या संयुक्त विद्यमाने, तसेच अली अब्बास जफर लिखित आणि दिग्दर्शित या चित्रपटाची निर्मिती वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख, जॅकी भगनानी, हिमांशू किशन मेहरा आणि अली अब्बास जफर यांनी केली आहे. या चित्रपटाचे शूटिंग पुढील वर्षी सुरू होण्याची शक्यता आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा 

Website | + posts

Leave a comment

Instagram

[instagram-feed]

Facebook

[FBW]

Twitter

We are available on Google Play Store. Get it now.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.

We are available on Google Play Store. Get it now.

Navrang Ruperi © 2023. All rights reserved.