आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर इंस्टाग्राम

————————

लाइट्स, कैमरा आणि हास्याचा रोमांचक मुकाबला आपल्या समोर सादर होणार आहे कारण अमेझॉनची फ्री व्हिडीओ एंटरटेनमेन्‍ट सर्विस ‘मिनीटीवी’ने (Amazon MiniTV) कॉमिक कंटेंटसाठी एक्‍सक्‍लूसिव लाइन-अपची घोषणा केली आहे. हा कंटेंट खास करून मिनीटीवीच्या ग्राहकांसाठी तयार करण्यात आला असून भारताचे लोकप्रिय विनोदवीर आशीष चंचलानी, प्राजक्‍ता कोळी, अमित भड़ाना, डॉली सिंह, सलोनी गौर आणि बी यूनिक आपल्या विनोदी ठसक्याच्या भरपूर व्हिडीओंसोबत दर्शकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. (Amazon MiniTV brings Exclusive Comic Content for its Viewers for free) 

भारतातील लोकप्रिय विनोदीवीरांची ही भागीदारी रोजमर्राच्या आयुष्यातील अनोखे स्कीट्स तयार करणार असून सर्वात आधी एक्‍सक्‍लूसिव रूपात अमेझॉनच्या प्रेक्षकांसाठी मिनीटीवीवर प्रदर्शित करण्यात येईल. डॉली सिंहचे ह्यूमरस स्‍केच तुम्हाला ब्रेक-अप मधून सावरण्याचे 7 स्‍टेजेस सांगेल तर, प्राजक्‍ता कोळी ‘मिडिल क्‍लास हैक्‍स’ च्या कलेत कसे परफेक्‍ट होता येईल, हे सांगेल. आपल्या अनोख्या अंदाजात आशीष चंचलानी तुम्हाला ‘ब्‍यूटी एंड फैशन इंफ्लूएंसर’च्या अद्भुत दुनियेत घेऊन जाईल आणि अमित भड़ाना अति उत्‍साही बॉस आणि पूर्वप्रेमिकेच्यामध्ये अडकलेल्या सेल्‍समैनच्या भूमिकेत असेल.

बी यूनिक आपल्या मित्रांसोबत मजेदार तथा वास्‍तविक वाटणारे ब्रेकअप मधून बाहेर येण्याचे किस्‍से शेयर करेल. नात्यांमधील स्‍पूफपासून चोरी करण्यात मददगार ठरणाऱ्या शानदार अॅपपर्यंत,  हे विनोदवीर आणि त्यांचा कंटेंट निश्चितपणे दर्शकांना हसवून लोट-पोट करून टाकेल.

हेही वाचा – ‘कोण होणार करोडपती’मध्ये कर्मवीर म्हणून खेळणार नाना पाटेकर!

Website | + posts

Leave a comment