पानिपत लढाईनंतरच्या या भयाण वास्तवावर भाष्य करणाऱ्या ‘बलोच’ (Marathi Film Baloch) या चित्रपटाचे टिझर पोस्टर नुकतेच प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे. मराठ्यांनी दिलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रकाश जनार्दन पवार यांनी केले असून यात प्रवीण विठ्ठल तरडे (Actor Pravin Tarade) यांची मुख्य भूमिका आहे. विश्वगुंज पिक्चर्स आणि गुलाब प्रोडक्शन प्रस्तूत या चित्रपटाची कथाही प्रकाश जनार्दन पवार यांचीच आहे. (Pravin Tarde shines in the teaser poster of Prakash Janardhan Pawar’s directorial Baloch) 

baloch marathi film poster

इतिहासातील कायमस्वरूपी लक्षात राहणारी बाब म्हणजे पानिपतचा पराभव. त्या पराभवनानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या या टिझर पोस्टरमध्ये पिळदार मिशा, करारी मुद्रा, डोळ्यात धगधगती आग असलेले प्रवीण तरडे दिसत आहेत. त्यांचा हा रांगडा अवतार सर्वांच्याच नजरा खिळवून ठेवणारा आहे. जीवन जाधव, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्मित या चित्रपटाचे सहनिर्माता महेश करवंदे, सुधीर वाघोले, गणेश शिंदे, विजय अल्दार, दत्ता काळे आहेत. बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेल्या मराठ्यांची विजयगाथा असलेला हा चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

हेही वाचा – अमेझॉन मिनी टीवीवर कॉमिक कार्यक्रमांची घोषणा

Website | + posts

Leave a comment