आमचे सर्व अपडेट्स मिळविण्यासाठी फॉलो करा  :  फेसबुक I ट्विटर I इंस्टाग्राम

————————

Teaser launch of “Thech” movie. The film is set to release on July 15. पुढच्यास ठेच मागचा शहाणा अशी एक म्हण मराठीत आहे. आयुष्याचा प्रवास ठेचा खाऊनच होतो. काहीवेळा प्रेमातही ठेच खावी लागते. कॉलेजजीवनातील प्रेमात खाल्लेली ‘ठेच’ आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार असून, १५ जुलैला प्रदर्शित होणाऱ्या या चित्रपटाचा टीजर सोशल मीडियात लाँच करण्यात आला आहे.

श्री नृसिंह फिल्म प्रॉडक्शन प्रस्तुत ठेच या चित्रपटाची निर्मिती शिवाजी बोचरे, ज्ञानदेव काळे, सय्यद मोईन सय्यद नूर, कैलास थिटे, श्रीराम वांढेकर, गजानन टाके यांनी केली आहे. लक्ष्मण सोपान थिटे यांनी चित्रपटाचं कथालेखन आणि दिग्दर्शन केलं आहे. किरण कोठेकर, हेमंत शेंडे यांनी छायांकन, फैसल आणि इमरान महाडिक यांनी संकलन, तन्मय भावे यांनी संगीत दिग्दर्शन केलं आहे.

प्रेमाचा त्रिकोण ही संकल्पना अजरामर आहे. “ठेच” या चित्रपटात प्रेमत्रिकोणाचीच गोष्ट मांडण्यात आली आहे. कॉलेजमधून आवेगानं धावणारी मुलगी टीजरमध्ये दिसत आहे. फ्रेश लुक, लक्षवेधी संगीत आणि चित्रीकरणाची जोड मिळाली आहे. त्यामुळे आता चित्रपटाचा ट्रेलर आणि चित्रपट प्रदर्शित होण्याची प्रेक्षकांना प्रतीक्षा आहे.

चित्रपट जगताच्या अन्य बातम्यांकरिता क्लिक करा

Website | + posts

Leave a comment